Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Lal Mirchi : नंदुरबारच्या लाल मिरचीची लाली वाढली, अखेर 'जीआय' मानांकन मिळाले!

Lal Mirchi : नंदुरबारच्या लाल मिरचीची लाली वाढली, अखेर 'जीआय' मानांकन मिळाले!

latest News Lal mirchi GI Nandurbar's red chillies have received GI status | Lal Mirchi : नंदुरबारच्या लाल मिरचीची लाली वाढली, अखेर 'जीआय' मानांकन मिळाले!

Lal Mirchi : नंदुरबारच्या लाल मिरचीची लाली वाढली, अखेर 'जीआय' मानांकन मिळाले!

Nandurbar Lal Mirchi : नंदुरबारच्या लाल मिरचीला जीआय मानांकन मिळाले आहे.

Nandurbar Lal Mirchi : नंदुरबारच्या लाल मिरचीला जीआय मानांकन मिळाले आहे.

नंदुरबार : येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील लाल मिरची (Nandurbar Lal Mirchi) या कृषी उत्पादनास भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन प्रमाणपत्र सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा (Nandurbar District) हा मिरची उत्पादनासाठी ओळखला जातो. लाल मिरची (Red Chilli) येथील मुख्य पिकांपैकी एक आहे. येथील मिरचीचा दर्जा चांगला असल्याचे मानले जाते. रेशीमपट्टा, बेडगी मिर्ची यांसारख्या विविध प्रकारच्या मिरच्या नंदुरबारमध्ये आढळतात, ज्या त्यांच्या तिखटपणासाठी ओळखल्या जातात.  त्यावर या मानांकनाने शिक्कामोर्तब झाले आहे. 

शिवाय नंदुरबारमधून मिरचीची निर्यात देखील केली जाते. तसेच नंदुरबारमध्ये मिरचीची थेट विक्री तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून देखील विक्री केली जाते.  कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील शास्त्रज्ञांनी नंदुरबार जिल्ह्यातील मिरचीचे गुणधर्म, वैशिष्ट्ये तसेच भौगोलिक वातावरण याबाबत लाल लाल, मिरचीला भौगोलिक मानांकन मिळावे, याकरिता प्रस्ताव सादर केला. 

यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करून जिल्ह्यासाठी मिरची या कृषी मालाला जीआय अर्थात भौगोलिक मानांकन मिळाले. मुबंई येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवळीवाले, विश्वस्त यशपाल पटेल यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. 

Web Title: latest News Lal mirchi GI Nandurbar's red chillies have received GI status