Lokmat Agro >शेतशिवार > Ladaki Bahin Yojana : ....तर 'त्या' लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही, जाणून घ्या सविस्तर 

Ladaki Bahin Yojana : ....तर 'त्या' लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Ladaki Bahin Yojana 'those' ladki bahin will not get Rs. 1500 rupees, know the details | Ladaki Bahin Yojana : ....तर 'त्या' लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही, जाणून घ्या सविस्तर 

Ladaki Bahin Yojana : ....तर 'त्या' लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही, जाणून घ्या सविस्तर 

Ladaki Bahin Yojana : अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. 

Ladaki Bahin Yojana : अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

चंद्रपूर :संजय गांधी निराधार योजनेंतर्गत (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या (Ladaki Bahin Yojana) लाभासाठी अर्ज सादर केला होता. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली. मात्र, ज्या महिलांना निराधार योजनेतून अनुदान मिळत असेल, अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. 

निराधार व्यक्ती, अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजार, घटस्फोट किंवा दुर्लक्षित महिला, अत्याचारग्रस्त महिला, तृतीयपंथी आदींना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत सामावून घेतले जाते. 

जिल्ह्यात अनेक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांना नियमित अनुदान मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाने या महिलांना नियमित अनुदान देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित आहेत. सदर महिलांना केव्हा लाभ मिळणार, याची प्रतीक्षा आहे. आपल्या बँक खात्यात पैसे केव्हा जमा होतील, याची त्या वाट बघत असतात.

कागदपत्रे जमा न केल्यास अनुदान होणार बंद 
ज्या निराधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान बंद होणार आहे. विशेष म्हणजे, यातून छाननी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनांच लाभ घेत आहेत. त्यांना आता अडचणी भेळसाडणार असून त्यांचे अनुदान बंद होणार आहे. 

फेब्रुवारीपासून अनुदान बंद होण्याची शक्यता 
दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान बंद होणार आहे. यासाठी प्रशासनाने कागदपत्रांची छाननी सुरू केली असल्याची माहिती आहे. तसेच अनेक महिलांनी स्वेच्छेने अर्ज माघारी घेण्यास प्रशासनाकडे निवेदन दिले आहेत. निवेदन देण्याचा ओघ सुरुच आहे. ३० च्यावर महिलांनी अर्ज केले असल्याची माहिती आहे.

आधार, बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बैंक पासबुक महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही दिवसांत ही प्रकिया पूर्ण होणार आहे. ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांची पडताळणी केली जाणार आहे.

२५ जानेवारीपासून लाभ मिळण्यास सुरुवात 
लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरवात झालेली आहे. जानेवारी महिन्याचे पैसे महिलांना २५ जानेवारीपासून बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून आढावा सुद्धा घेतला जात आहे. काही लाभाथ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. 

Web Title: Latest News Ladaki Bahin Yojana 'those' ladki bahin will not get Rs. 1500 rupees, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.