Krishi University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या विद्यापीठ शिवारफेरी उपक्रमात शेतकऱ्यांना २० ते २२ सप्टेंबरदरम्यान ३०० प्रगत पिकांचे थेट प्रात्यक्षिक पाहण्याची आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. (Krishi University)
११०० हेक्टर क्षेत्रावर होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात राज्यभरातून सुमारे १ लाख शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.(Krishi University)
शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती पद्धती आणि संशोधनाची थेट माहिती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी विद्यापीठ शिवारफेरीचे आयोजन केले आहे. (Krishi University)
११०० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके
विद्यापीठाच्या संशोधन विभागातील तब्बल ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे.
तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चारा पिके, धान अशा विविध पिकांवरील अत्याधुनिक शेती पद्धती प्रत्यक्ष दाखविल्या जाणार आहेत.
१० खासगी कृषी निविष्ठा कंपन्याही सहभागी होऊन नव्या उत्पादने व तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.
संवाद व मार्गदर्शनाची संधी
या शिवारफेरीत शेतकरी, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योग भागधारक यांच्यात थेट संवादाची संधी मिळणार आहे.
शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल शेती पद्धतींवर चर्चा
पीक उत्पादकता वाढवण्यासाठी उपाययोजना
शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा
२२ सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक बा. कच्छवे यांनी शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उपक्रमाचा उद्देश
नवतंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन
शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी सहाय्य
संशोधन आणि प्रत्यक्ष शेती यांच्यातील दुवा मजबूत करणे
विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी सांगितले की, शिवारफेरी शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत भर घालण्यासाठी आणि नव्या संधी शोधण्यासाठी महत्त्वाची ठरेल.