Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Shivar Feri Akola : नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा; नुकसानभरपाई लवकर : कृषिमंत्री भरणे

Kharif Shivar Feri Akola : नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा; नुकसानभरपाई लवकर : कृषिमंत्री भरणे

latest news Kharif Shivar Feri Akola: Relief for farmers in natural calamities; Compensation soon: Agriculture Minister Bharane | Kharif Shivar Feri Akola : नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा; नुकसानभरपाई लवकर : कृषिमंत्री भरणे

Kharif Shivar Feri Akola : नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा; नुकसानभरपाई लवकर : कृषिमंत्री भरणे

Kharif Shivar Feri Akola : 'नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी हताश होऊ नये,' असा संदेश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित खरीप शिवार फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Kharif Shivar Feri Akola)

Kharif Shivar Feri Akola : 'नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी हताश होऊ नये,' असा संदेश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित खरीप शिवार फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Kharif Shivar Feri Akola)

शेअर :

Join us
Join usNext

Kharif Shivar Feri Akola : 'नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी हताश होऊ नये,' असा संदेश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharane) यांनी दिला.(Kharif Shivar Feri Akola)   

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित खरीप शिवार फेरीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, पिकांच्या पंचनाम्यानंतर नुकसानभरपाई लवकरच वितरित केली जाईल. (Kharif Shivar Feri Akola)   

बदलत्या हवामानाशी सामना करताना नवे तंत्रज्ञान, पूरक व्यवसाय आणि संशोधन यांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर त्यांनी भर दिला.(Kharif Shivar Feri Akola)   

राज्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानाच्या फटक्याने त्रस्त असताना, 'एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही', अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. (Kharif Shivar Feri Akola)   

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय खरीप शिवार फेरी आणि चर्चासत्र याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Kharif Shivar Feri Akola) 

नुकसानाचे पंचनामे सुरू; भरपाई लवकरच

मंत्री भरणे यांनी सांगितले की, यंदा सततच्या पावसामुळे ६३ लाख ५१ हजार ५२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे व जमिनीचे नुकसान झाले आहे. 

शेतकऱ्यांनी हताश होऊ नयेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून पंचनामे करून लवकरच नुकसानभरपाई दिली जाईल.

त्यांनी संशोधन, बाजारपेठ उपलब्धता आणि एकात्मिक शेती पद्धतीवर भर देत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पूरक व्यवसाय आणि नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले.

शिवार फेरीत नवे वाण आणि तंत्रज्ञान

शिवार फेरीतून शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठांनी विकसित केलेल्या नव्या वाणांची, शेतीतील नवे संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती पोहोचविली जाईल.

कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार अनुप धोत्रे, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, 'महाबीज'चे प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

कृषी योजनांसाठी ११ हजार कोटींची तरतूद

कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी ६ हजार कोटी रुपये आणि कृषी समृद्धी योजनेसाठी ५ हजार कोटी रुपये  अशी एकूण ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नवे तंत्रज्ञान आणि साधने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातील.

शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अपेक्षा

कार्यक्रमादरम्यान शेतकरी किशोर सरोदे यांनी प्रश्न मांडला की, शिवार फेरीसाठी रस्ता आहे, पण आमच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता का नाही साहेब?

तर महिला बचत गटाच्या सदस्यांनी अतिवृष्टीतील नुकसानीबाबत मदत कधी मिळेल, असा सवाल उपस्थित केला.

'अर्थव्यवस्थेला बळकट करण्याची ताकद शेतकऱ्यांत': जयस्वाल

कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, शेतीमुळेच राज्याची अर्थव्यवस्था बळकट होते. विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविली जात आहे. तसेच कृषी क्षेत्रात एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. विद्यापीठांनी संशोधनासोबत ठोस उपक्रम हाती घ्यावेत.

शेतमाल खरेदीवर खासदार धोत्रेंची सूचना

खासदार अनुप धोत्रे यांनी शासनाला आवाहन केले की, सोयाबीन व कापसाची हमी दराने खरेदी तातडीने सुरू करावी. तसेच ड्रोन तंत्रज्ञान, कांदा प्रक्रिया उद्योगासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या मंजुरीसाठी प्रयत्न व्हावेत.

तीन दिवसीय खरीप शिवार फेरीत शेतीसाठी नवे वाण, तंत्रज्ञान, संशोधन यांचा परिचय होणार असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना आणि भरपाईची आश्वासने दिली आहेत. 

नैसर्गिक संकटे आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानांसमोर शेतकरी न डगमगता आधुनिक तंत्रज्ञानासह प्रगत शेतीकडे वळावेत, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

हे ही वाचा सविस्तर : Krishi University : शेतीत प्रगती साधायची आहे का? मग या शिवारफेरीला हजेरी लावा!

Web Title: latest news Kharif Shivar Feri Akola: Relief for farmers in natural calamities; Compensation soon: Agriculture Minister Bharane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.