Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Shivar Feri Akola : शेतकऱ्यांनी फुलली शिवार फेरी; प्रगत शेतीचा अनुभव वाचा सविस्तर

Kharif Shivar Feri Akola : शेतकऱ्यांनी फुलली शिवार फेरी; प्रगत शेतीचा अनुभव वाचा सविस्तर

latest news Kharif Shivar Feri Akola : Farmers celebrate Shivar festival; Read the experience of advanced farming in detail | Kharif Shivar Feri Akola : शेतकऱ्यांनी फुलली शिवार फेरी; प्रगत शेतीचा अनुभव वाचा सविस्तर

Kharif Shivar Feri Akola : शेतकऱ्यांनी फुलली शिवार फेरी; प्रगत शेतीचा अनुभव वाचा सविस्तर

Kharif Shivar Feri Akola : शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशीही विदर्भातील शेतकऱ्यांना भारावून टाकले. तीन दिवसीय फेरीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २३ हजारांहून अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती दर्शवून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. (Kharif Shivar Feri Akola)

Kharif Shivar Feri Akola : शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशीही विदर्भातील शेतकऱ्यांना भारावून टाकले. तीन दिवसीय फेरीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २३ हजारांहून अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती दर्शवून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. (Kharif Shivar Feri Akola)

शेअर :

Join us
Join usNext

Kharif Shivar Feri Akola : शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशीही विदर्भातील शेतकऱ्यांना भारावून टाकले. तीन दिवसीय फेरीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २३ हजारांहून अधिक शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थिती दर्शवून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला.(Kharif Shivar Feri Akola)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे आयोजित या फेरीत शेतकऱ्यांना थेट प्रात्यक्षिकातून खरीप हंगामातील विविध पिक पद्धती, तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसंबंधित माहिती मिळाली.(Kharif Shivar Feri Akola)

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी विदर्भातील वर्धा, नागपूर, गडचिरोली, बुलढाणा जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांनी सकाळी ९ वाजता नोंदणी करून विद्यापीठाच्या नियोजित २६ संशोधन केंद्रांना भेट देत प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांसोबत थेट चर्चा करून आपले शंका निरसन केले.

राष्ट्रीय पातळीवर दखल

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत कृषि प्रद्योगिकी अनुप्रयोग अनुसंधान संस्थान, आटारी पुणेचे संचालक डॉ. सुब्रतो रॉय यांनी शिवार फेरीला राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे मानले, तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांनी देखील अशा कार्यक्रमांचे आयोजन शेतकरी हितासाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन केले.

विद्यापीठाचे मार्गदर्शन

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी शाश्वत ग्रामविकासासाठी शेतकऱ्यांसोबत एकात्मिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी शेतीत उत्पादन वाढीस हातभार लावावा, असे मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान

२५ एकर क्षेत्रात खरीप पिकांचे विविध प्रात्यक्षिक

२१० विविध पिकांच्या जातींचा समावेश : तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला, फुलांची जात

संशोधन व प्रयोगात्मक प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांचे निरीक्षण व मार्गदर्शन

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाद्वारे थेट संवाद

शंका समाधान

तणनाशके, कापूस, सोयाबीन, तेलबिया, कडधान्य, औषधी व सुगंधी वनस्पती रोगशास्त्र, कृषी अभियांत्रिकी विषयक शंका समाधान करण्यात आले.

धारणी मेळघाट येथील आदिवासी महिला सदस्यांनी तंत्रज्ञान विषयक अनुभव शेअर केले.

शेतकऱ्यांना शाश्वत शेती व उत्पादन सुधारणा सुलभ करण्यासाठी मार्गदर्शन

विद्यापीठ प्रशासनाचे योगदान

संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे नेतृत्वात वरिष्ठ शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांचे अथक परिश्रम घेतले.

प्रत्येक विभागाचे तंत्रज्ञान थेट प्रात्यक्षिकांसह प्रदर्शित

शेतकऱ्यांची अभूतपूर्व उपस्थिती, तंत्रज्ञानाचा अनुभव आणि विद्यापीठाचे मार्गदर्शन हे विदर्भातील शेतीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले. उद्या, २२ सप्टेंबर रोजी शिवार फेरीचा अंतिम दिवस असून त्यातही शेतकऱ्यांनी अधिकाधिक सहभाग घेतल्यास ही प्रेरणा अधिक वृद्धिंगत होईल.

हे ही वाचा सविस्तर : Soil Health Management : डिजिटल मृदा नकाशा व एआयमुळे माती व्यवस्थापनात नवा अध्याय वाचा सविस्तर

Web Title: latest news Kharif Shivar Feri Akola : Farmers celebrate Shivar festival; Read the experience of advanced farming in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.