Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Season Update : शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद, खत विक्रीही वेगात वाचा सविस्तर

Kharif Season Update : शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद, खत विक्रीही वेगात वाचा सविस्तर

latest news Kharif Season Update: Farmers respond spontaneously to seed purchases, fertilizer sales also increase Read in detail | Kharif Season Update : शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद, खत विक्रीही वेगात वाचा सविस्तर

Kharif Season Update : शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद, खत विक्रीही वेगात वाचा सविस्तर

Kharif Season Update : खरीप हंगामासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, बियाणे व खते दोन्हीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. प्रशासनाची तपासणी व कारवाई प्रक्रिया यामुळे यंदाचा हंगाम अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्याची शक्यता आहे.

Kharif Season Update : खरीप हंगामासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, बियाणे व खते दोन्हीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. प्रशासनाची तपासणी व कारवाई प्रक्रिया यामुळे यंदाचा हंगाम अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शिरीष शिंदे 

खरीप हंगामासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, बियाणे व खते दोन्हीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. प्रशासनाची तपासणी व कारवाई प्रक्रिया यामुळे यंदाचा हंगाम अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत बियाण्यांची १२ लाख पाकिटे उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक विकली गेली असून, कृषी विभाग आणि भरारी पथक बोगस बियाण्यांवर करडी नजर ठेवून आहेत.

बीड जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून, शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२ लाख २५ हजार बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झाली असून, त्यापैकी ९ जूनपर्यंत तब्बल ६ लाखांहून अधिक पाकिटांची विक्री झाली आहे.  पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने खरीपासाठी सज्ज होताना दिसत आहेत.

बोगस बियाण्यांवर करडी नजर

बनावट बियाण्यांची विक्री थांबवण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. कृषी दुकानदारांची अचानक तपासणी केली जात असून, नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जात आहे. गुणवत्ता टिकवण्यासाठी ही पावले आवश्यक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसाची प्रतीक्षा आणि प्रस्तावित पेरणी क्षेत्र

जिल्ह्यात ८ लाख १० हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप पावसाने काही भागात उशीर केला आहे. ज्या भागांमध्ये वाफसा झाले आहे, तिथे मशागत पूर्ण झाली असून, पावसाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पेरणी सुरू होण्याची शक्यता आहे.

बियाण्यांची मागणी आणि पुरवठा ठरला योग्य वेळेत

गेल्या वर्षी कापूस व सोयाबीनच्या पेरणीला अधिक प्राधान्य देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने मागणीच्या आधारे बियाण्यांचे नियोजन केले आहे. 

तरीसुद्धा काही ठिकाणी खत विक्रीदरात गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने जादा दराने विक्री व खरेदी बिल न ठेवणे या कारणांवरून नुकतेच निलंबित करण्यात आले आहेत.

बियाण्याचा वाण२०२४ विक्री२०२५ नियोजन२०२५ पर्यंत पुरवठा
कब्बडी८७,०००९८,०००१,६१,०००
बाऊंसर५,०००१८,०००१७,९७०
युएस५०,२००
संकेत९,५००५७,२००
एकूण१,५१,७००२,०८,०००२,६८,१७०

खत वितरणाची स्थिती व कारवाई

मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खते खरेदी केली असून, खालीलप्रमाणे खतविक्री झाली आहे.

खत प्रकारखरीप मागणी (टन)शिल्लक (मार्च)९ जून अखेर विक्री
युरिया५४,०००२४,१४३१७,९३४
डीएपी२६,०००४,३८०१०,८०४
एमओपी९९,३००४४,५०९९७३
एसएसपी२,२०३२३,६१७
एनपीके४,०००

हे ही वाचा सविस्तर : Kharif Season : खरीपाआधीच टंचाईचे संकट; वेळेवर पेरणी होणार का? वाचा सविस्तर

Web Title: latest news Kharif Season Update: Farmers respond spontaneously to seed purchases, fertilizer sales also increase Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.