Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Season : मराठवाड्यात ९० टक्के पेरणी पूर्ण; तरीही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

Kharif Season : मराठवाड्यात ९० टक्के पेरणी पूर्ण; तरीही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

latest news Kharif Season: 90 percent sowing completed in Marathwada; Still, farmers are waiting for heavy rains | Kharif Season : मराठवाड्यात ९० टक्के पेरणी पूर्ण; तरीही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

Kharif Season : मराठवाड्यात ९० टक्के पेरणी पूर्ण; तरीही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

Kharif Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाची सरासरी केवळ ६५ टक्क्यांवर आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येकजण डोळे लावून बसला आहे.(Marathwada Sowing)

Kharif Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाची सरासरी केवळ ६५ टक्क्यांवर आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येकजण डोळे लावून बसला आहे.(Marathwada Sowing)

शेअर :

Join us
Join usNext

Kharif Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाची सरासरी केवळ ६५ टक्क्यांवर आहे. (Marathwada Sowing)

बीड जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येकजण डोळे लावून बसला आहे.(Marathwada Sowing)

मराठवाड्यात रविवारपर्यंत ९० टक्के क्षेत्रावर पेरणी आणि ६५ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (Marathwada Sowing)

मराठवाड्यात पावसाचा पॅटर्न सतत बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मराठवाड्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस पडला. जून महिन्यात मात्र पेरणीलायक पाऊस झाला होता. काही जिल्ह्यात तोही झाला नाही. यामुळे यंदा खरिपाची पेरणी लांबलेली दिसते. (Marathwada Sowing)

यावर्षी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ लाख ८१ हजार ९०३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी होते. (Marathwada Sowing)

यावर्षी ६ लाख ३२ हजार ६७० हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली. 

२ आठवड्यांपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला नव्हता. गंगापूर तालुक्यातील ३ गावांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र, नंतर पेरणीसाठी उपयुक्त पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. बीडमध्ये सर्वांत कमी पावसाचे प्रमाण झाले असून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्हानिहाय पेरणीची माहिती (हेक्टर व टक्केवारीत)

जिल्हापेरणी क्षेत्र (हेक्टर)टक्केवारी (%)
छत्रपती संभाजीनगर६,३२,६७०९३
जालना५,८७,४६०९१
बीड६,७१,५०४८३
लातूर५,५७,३७१९५
धाराशिव५,१०,५७४९२
नांदेड७,२१,९३२९५
परभणी४,६४,७७६९०
हिंगोली३,४७,८०९८५

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : फळबागा, भाजीपाला व्यवस्थापन महत्त्वाचे; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Web Title: latest news Kharif Season: 90 percent sowing completed in Marathwada; Still, farmers are waiting for heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.