Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Crop Cultivation : अतिवृष्टीचा फटका, तरीही हळदीची लागवड शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर

Kharif Crop Cultivation : अतिवृष्टीचा फटका, तरीही हळदीची लागवड शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर

latest news Kharif Crop Cultivation: Heavy rains hit, but farmers still support turmeric cultivation Read in detail | Kharif Crop Cultivation : अतिवृष्टीचा फटका, तरीही हळदीची लागवड शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर

Kharif Crop Cultivation : अतिवृष्टीचा फटका, तरीही हळदीची लागवड शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर

Kharif Crop Cultivation: यंदा खरीप पिकांच्या पेरणीचे सरासरी क्षेत्र घटले असले, तरी हळदीच्या पिकाने शेतकऱ्यांना नवा दिलासा दिला आहे. पावसाळ्याच्या विलंबानंतर झालेल्या अतिवृष्टीने मुग-उडिदसारख्या पिकांची लागवड मर्यादित राहिली. मात्र, हळदीने विक्रम प्रस्थापित केला आहे. वाचा सविस्तर (Kharif Crop Cultivation)

Kharif Crop Cultivation: यंदा खरीप पिकांच्या पेरणीचे सरासरी क्षेत्र घटले असले, तरी हळदीच्या पिकाने शेतकऱ्यांना नवा दिलासा दिला आहे. पावसाळ्याच्या विलंबानंतर झालेल्या अतिवृष्टीने मुग-उडिदसारख्या पिकांची लागवड मर्यादित राहिली. मात्र, हळदीने विक्रम प्रस्थापित केला आहे. वाचा सविस्तर (Kharif Crop Cultivation)

शेअर :

Join us
Join usNext

Kharif Crop Cultivation : यंदा खरीप पिकांच्या पेरणीचे सरासरी क्षेत्र घटले असले, तरी हळदीच्या पिकाने शेतकऱ्यांना नवा दिलासा दिला आहे. पावसाळ्याच्या विलंबानंतर झालेल्या अतिवृष्टीने मुग-उडिदसारख्या पिकांची लागवड मर्यादित राहिली. (Kharif Crop Cultivation)

मात्र, हळदीने विक्रमी ६३६५ हेक्टरवर पसरून उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कपाशीची पेरणीही सरासरीपेक्षा जास्त झाली असून, पावसाच्या आव्हानांवर मात करत शेतकऱ्यांनी सुवर्णपिकांकडे वळण्याचा प्रयत्न केला आहे. (Kharif Crop Cultivation)

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पिकांच्या पेरणीचे सरासरी क्षेत्र घटले असले तरी हळदीच्या लागवडीत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. (Kharif Crop Cultivation) 

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, तालुक्यात ६९ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून हे अपेक्षित सरासरी क्षेत्राच्या ९४.५९ टक्के आहे. मात्र, हळदीचे क्षेत्र तब्बल ३६० टक्क्यांनी वाढून ६३६५ हेक्टरवर पोहोचले आहे. (Kharif Crop Cultivation)

अतिवृष्टीचा फटका, पिकांचे नुकसान

या वर्षी पावसाळ्याला सुरुवातीला विलंब झाला; परंतु नंतर झालेल्या अतिवृष्टीने अनेक पिकांचे नुकसान झाले. मुग, उडिद यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करता आली नाही. तरीही, तालुक्यात हळद आणि कपाशी या पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

कपाशीच्या क्षेत्रातही वाढ

रिसोड तालुक्यात कपाशीच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. सरासरी १७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३१२ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. हे अपेक्षित क्षेत्राच्या १८१ टक्के आहे.

पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त

तालुक्यात सरासरी ८०८.१० मि.मी. पावसाची अपेक्षा असते. मात्र, ९ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष ८८६.४० मि.मी. पाऊस झाला असून, हे प्रमाण सरासरीच्या १०९ टक्के आहे.

कोणत्या पिकाची किती पेरणी (हेक्टरमध्ये)

पीकपेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सोयाबीन५५,३४१
कपाशी३१२
हळद६,३६५
तूर१२,९९४
मूग१९९
उडीद१९३

रिसोड तालुक्यात यंदा खरीप पिकांची पेरणी थोडीशी घटली असली तरी हळद आणि कपाशी या पिकांनी उत्पादनाच्या दृष्टीने आशा निर्माण केली आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन हळदीच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळाल्याचे स्पष्ट होते.

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : कापूस, तूर शेतकऱ्यांसाठी आवश्यक सल्ला वाचा सविस्तर

Web Title: latest news Kharif Crop Cultivation: Heavy rains hit, but farmers still support turmeric cultivation Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.