Jamin Kharedi Khat : तुमच्या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करता येते. यात गट नंबर, मूळ मालकाचं नाव, चतुःसीमा, क्षेत्र , झाडे, पाणी व्यवस्था व इतर तंगभूत नोंदी पाहायला मिळतात. त्या तपासून घेणे महत्वाचे असते.
तसेच जमीन वडिलोपार्जित असेल व जमिनीची वाटणी झाली नसल्यास वारसांची संमती आहे की नाही ते तपासून घ्यावे. जमीन स्वकष्टार्जित असल्यास वारसांच्या संमतीची गरज नाही. असेही निदर्शनास आले आहे की बहुतांश लोक हे शेत जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार हे स्टॅम्प पेपरवर नोटरी करून करतात.
पण केवळ नोटरी केलेला व स्टॅम्प शुल्क न भरता तयार केलेला इसार पावती विक्री करार कायदेशीर नसून, तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे जमीन, प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार नोटरीवर चालणार नाही, रजिस्ट्रीच करावी लागणार आहे.
इतर अधिकारांची नोंद
सातबारावर इतर अधिकारमध्ये नावे असतील तर आवश्यक ती माहिती करून घेणे. तसेच जमिनीला कुळ आहे का हे सुद्धा बघितले पाहिजे, जर कुळ असेल तर ते कुळ कोणत्या प्रकारात मोडते, ही बाब आपण जाणली पाहिजे. तसेच ती जमीन आरक्षित प्रकारातील आहे का, याची माहिती घ्यावी.
- ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे
कायदे विषयक अभ्यासक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार
पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन प्रमाणित