Lokmat Agro >शेतशिवार > Karle Lagvad : भरघोस उत्पादन देणारे कारल्याचे हिरकणी वाण, अशी करा बियाणे खरेदी 

Karle Lagvad : भरघोस उत्पादन देणारे कारल्याचे हिरकणी वाण, अशी करा बियाणे खरेदी 

Latest News Karle Lagvad Buy seeds of Hirkani variety of bitter gourd that gives high yield | Karle Lagvad : भरघोस उत्पादन देणारे कारल्याचे हिरकणी वाण, अशी करा बियाणे खरेदी 

Karle Lagvad : भरघोस उत्पादन देणारे कारल्याचे हिरकणी वाण, अशी करा बियाणे खरेदी 

Karle Lagvad : कारल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असल्याने नेहमीच बाजारात मागणी राहते.

Karle Lagvad : कारल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असल्याने नेहमीच बाजारात मागणी राहते.

शेअर :

Join us
Join usNext

Karle Lagvad : अलीकडे फळशेतीबरोबरच भाजीपाला लागवड (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यात कारले शेतीही वाढू लागली आहे. कारल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असल्याने नेहमीच बाजारात मागणी राहते. कारल्याच्या लागवडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे खर्चाच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळते. 

जर तुम्हालाही कारले लागवड (Karle Lagvad) करायची असल्यास राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (National Seed Corporation) कारले बियाण्याची ऑनलाईन विक्री सुरु आहे. त्यातही कारल्याचे "हिरकणी"  हे वाण चांगलेच प्रसिद्ध आहे. 

येथून कारल्याचे बियाणे मिळतील.
बाजारात कारल्याची मागणी वर्षभर कायम असते. त्यामुळे शेतकरी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, राष्ट्रीय बियाणे महामंडळ कारल्याचे बियाणे ऑनलाइन विकत आहे. या वेबसाइटच्या ऑनलाइन स्टोअरमधून हे बियाणे खरेदी करून लागवड करू शकता. 

हिरकणी जातीची खासियत
हिरकणी ही कारल्याची एक खास जात आहे. या जातीची लागवड उत्तर भारतातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये केली जाते. या जातीची लागवड फेब्रुवारी ते जून या कालावधीत करता येते. या जातीच्या फळांमध्ये जास्त लगदा असतो. तसेच, या जातीच्या वनस्पतींची लांबी सुमारे १.२० मीटर आहे आणि प्रत्येक फळाचे वजन सुमारे १५५ ग्रॅम आहे.

किंमत कशी आहे? 
या जातीपासून प्रति हेक्टर सरासरी १४० क्विंटल उत्पादन मिळू शकते. राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून कारल्याचे बियाणे इतर बाजारभावापेक्षा स्वस्त मिळेल. कारल्याच्या बियांच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे १० ग्रॅमचे पॅकेट ३१ रुपयांना ४३ टक्के सवलतीसह उपलब्ध आहे. 

Web Title: Latest News Karle Lagvad Buy seeds of Hirkani variety of bitter gourd that gives high yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.