Kapus Kharedi : आता विदर्भ व हिमायतनगर येथील भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या (CCI) खरेदी केंद्रांवर कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.(Kapus Kharedi)
किनवट व माहूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय अखेर शासन स्तरावर घेण्यात आला असून, कापूस खरेदीसाठी लादलेली प्रांतबंदी उठवण्यात आली आहे.(Kapus Kharedi)
यामुळे आता विदर्भ व हिमायतनगर येथील भारतीय कापूस निगम लिमिटेड (CCI) च्या खरेदी केंद्रांवर कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सीमावर्ती व आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.(Kapus Kharedi)
तेलंगणातील आदिलाबाद येथील सीसीआय खरेदी केंद्रावर किनवट व माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने आणि टोकन पद्धतीने खरेदी करण्यात यावी, या मागणीसाठी आमदार भीमराव केराम यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नवी दिल्ली येथे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर आयोगाच्या हस्तक्षेपामुळे या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.(Kapus Kharedi)
विदर्भ व हिमायतनगर केंद्रांवर विनाअट खरेदी
तूर्तास आदिलाबादऐवजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, पुसद, दारव्हा, घाटंजी, पांढरकवडा, महागाव तसेच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रांवर किनवट व माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस कोणतीही अट न घालता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिली.
केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण
किनवट हा आदिवासी बहुल तालुका असून येथे सीसीआयचे स्वतंत्र कापूस खरेदी केंद्र उपलब्ध नाही. तसेच खासगी कापूस जिनिंग केंद्रांना उशिरा मंजुरी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकण्याची वेळ येत होती. परिणामी व्यापाऱ्यांकडून मनमानी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत होती.
ही अन्यायकारक परिस्थिती लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांनी सीमावर्ती तेलंगणातील आदिलाबाद येथील सीसीआय खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी खुले करण्याची ठोस मागणी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे मांडली होती. या प्रयत्नांना आदिलाबादचे आमदार पायल शंकर यांचीही साथ लाभली.
१८ डिसेंबरला महत्त्वाची सुनावणी
या प्रकरणी १८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कापूस निगम लिमिटेड, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अधिकारी आणि आमदार भीमराव केराम यांची महत्त्वाची सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान यावर्षी आदिलाबाद येथे कापूस खरेदी शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र पुढील वर्षी किनवट व माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आदिलाबाद येथील सीसीआय खरेदी केंद्र खुले करण्याचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत विदर्भ व हिमायतनगर येथील सीसीआय केंद्रांवर विनाअट कापूस खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
शेतकऱ्यांमध्ये समाधान
या निर्णयामुळे किनवट-माहूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, हमीभावाने कापूस विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दीर्घकाळ प्रांतबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, पुढील वर्षी स्वतंत्र खरेदी केंद्र सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापसाच्या दरांचे भवितव्य टांगणीला; काय आहे कारण वाचा सविस्तर
