Lokmat Agro >शेतशिवार > Jwari Kharedi: 'सर्व्हर डाऊन'मुळे शासकीय ज्वारी खरेदी ठप्प; शेतकऱ्यांचं काय होणार? वाचा सविस्तर

Jwari Kharedi: 'सर्व्हर डाऊन'मुळे शासकीय ज्वारी खरेदी ठप्प; शेतकऱ्यांचं काय होणार? वाचा सविस्तर

latest news Jwari Kharedi: Government jowar Kharedi halted due to 'server down'; What will happen to farmers? Read in detail | Jwari Kharedi: 'सर्व्हर डाऊन'मुळे शासकीय ज्वारी खरेदी ठप्प; शेतकऱ्यांचं काय होणार? वाचा सविस्तर

Jwari Kharedi: 'सर्व्हर डाऊन'मुळे शासकीय ज्वारी खरेदी ठप्प; शेतकऱ्यांचं काय होणार? वाचा सविस्तर

Jwari Kharedi : राज्यात २९ मेपासून सुरू झालेली शासकीय ज्वारी खरेदी तांत्रिक अडचणींमुळे (Server Down) ठप्प झाली आहे. आठ दिवसांत केवळ २७८ क्विंटल खरेदी झाली असून, पावसाळा तोंडावर असताना शेतकरी खरेदी केंद्रांवर रांगेत उभे राहण्याच्या चिंतेत आहेत. शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Jwari Kharedi)

Jwari Kharedi : राज्यात २९ मेपासून सुरू झालेली शासकीय ज्वारी खरेदी तांत्रिक अडचणींमुळे (Server Down) ठप्प झाली आहे. आठ दिवसांत केवळ २७८ क्विंटल खरेदी झाली असून, पावसाळा तोंडावर असताना शेतकरी खरेदी केंद्रांवर रांगेत उभे राहण्याच्या चिंतेत आहेत. शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Jwari Kharedi)

शेअर :

Join us
Join usNext

Jwari Kharedi : राज्यात २९ मेपासून सुरू झालेल्या शासकीय ज्वारी खरेदी प्रक्रियेला सुरुवातीलाच मोठा तांत्रिक (Server Down) फटका बसला आहे. ऑनलाईन पोर्टलवर सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आठ दिवसांत केवळ २७८ क्विंटल ज्वारीचीच खरेदी झाली आहे. (Jwari Kharedi)

पावसाळा तोंडावर असताना शेतकरी खरेदी केंद्रांवर रांगेत उभे राहण्याच्या चिंतेत आहेत. व्याळा खरेदी-विक्री संघाद्वारे सुरू करण्यात आलेली ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुरेशी प्रभावी ठरत नसल्याने नाराजीचा सूर आहे.(Jwari Kharedi)

ऑनलाइन खरेदी यंत्रणा कोलमडली

खरेदी प्रक्रियेसाठी E-Portal वर नोंदणी आवश्यक आहे. मात्र, नोंदणी करताना सातत्याने 'सर्व्हर डाऊन'  (Server Down) , 'लोडिंग फेल' अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. काही वेळा खरेदीचे सत्र सुरू होताच तांत्रिक अडथळ्यामुळे संपूर्ण कामकाज बंद पडत आहे.

खासगी केंद्रांनाही अडथळे

तालुक्यात दोन खासगी खरेदी केंद्रांना परवानगी दिली गेली असली तरी, अद्याप शासनाकडून गोदाम सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही केंद्रेही अजून सुरू होऊ शकलेली नाहीत.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी

मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी तयारी करत आहेत. अशा वेळी विक्रीसाठी केंद्रांवर तासन्‌तास रांगा लावणे, पैसे वेळेवर न मिळणे आणि त्यामुळे लागवडीत अडथळा येणे. या साऱ्या समस्या शेतकऱ्यांवर डोंगरासारख्या कोसळल्या आहेत.

पावसाळा जवळ आला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी पेरणी करावी की, ज्वारी विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर रांगेत उभे राहावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उशीर झाल्यामुळे विक्रीचे पैसेही वेळेवर मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. - किशोर देशमुख, शेतकरी 

२९ मे रोजी खरेदीस सुरुवात झाली होती. मात्र, ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने खरेदी तत्काळ थांबवावी लागली. त्यामुळे केवळ २७८ क्विंटल ज्वारीच खरेदी करण्यात आली. - व्ही. डी. थोटे, प्रभारी सचिव, खरेदी-विक्री संघ 

हे ही वाचा सविस्तर : Jowar Kharedi: ज्वारी खरेदीला मुहूर्त मिळेना; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: latest news Jwari Kharedi: Government jowar Kharedi halted due to 'server down'; What will happen to farmers? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.