Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पचनसंस्था सुधारते, वजन कमी करते, साखरेवर नियंत्रण ठेवते, 'ही' भाकर आहारात असायलाच हवी!

पचनसंस्था सुधारते, वजन कमी करते, साखरेवर नियंत्रण ठेवते, 'ही' भाकर आहारात असायलाच हवी!

Latest News johar roti improves digestion, reduces weight, controls sugar by jwari roti see other benefits | पचनसंस्था सुधारते, वजन कमी करते, साखरेवर नियंत्रण ठेवते, 'ही' भाकर आहारात असायलाच हवी!

पचनसंस्था सुधारते, वजन कमी करते, साखरेवर नियंत्रण ठेवते, 'ही' भाकर आहारात असायलाच हवी!

Jwarichi Bhakar : या भाकरीची चव अनेकांना भुरळ घालत असून, आरोग्यासाठीही गुणकारी ठरत आहे.

Jwarichi Bhakar : या भाकरीची चव अनेकांना भुरळ घालत असून, आरोग्यासाठीही गुणकारी ठरत आहे.

वर्धा : 'ज्वारीची भाकर' ही आज प्रत्येकाच्या जेवणातील विशेष 'मेन्यू ठरला आहे. हॉटेल, लग्नसराई तसेच विविध घरगुती कार्यक्रमात 'झुणका-भाकर' 'भरीत भाकर' हा मेन्यू आवर्जून ठेवण्यात येत आहे. अनेकजण आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेताना दिसून येत आहे. 

अनेकजण वजन नियंत्रणात राहावे यासाठी सकाळ-संध्याकाळी आपल्या जेवणात भाकरीचा समावेश करत आहे. त्यामुळे भाकरीची चव अनेकांना भुरळ घालत असून, आरोग्यासाठीही गुणकारी ठरत आहे. विदर्भातील अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक ज्वारीचे पीक घेत असल्याचे दिसून येते. 

वजन नियंत्रणात राहण्यासाठी लाभदायक
जुनी पिढी दैनंदिन आहारात रोजच भाकरीचे सेवन करीत होते त्यामुळे आजही ते 'फिट' दिसतात. मात्र, कालांतराने ज्वारीच्या भाकरीची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पोळी मऊ व नरम होत असल्याने अनेक लहान मुलांच्या आवडीचा खाद्यपदार्थ बनला.

पचायला सोपी...
आरोग्याच्या दृष्टीने हे पचायला सोपे असल्याने पचनसंस्था सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण ठेवते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करून शरीराचे वजन नियंत्रण करण्याचे काम ज्वारी करीत असल्याने नागरिकांचा कल वाढला आहे. 

आधुनिक काळातही ज्वारीच्या पिकाकडे वळले

बावापूर येथील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी दीपक बर्डे हे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीची देशी वाण असलेले ज्वारीचे पीक घेत आहे. त्यांच्याकडे तीन प्रकारचे देशी वाण असून, त्या ज्वारीला मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात ज्वारीचा पेरा वाढत आहे.

पारंपरिक पद्धतीची देशी वाण आज महत्त्वाची माणल्या जात असल्याने शेतकरी अशा पिकांकडे वळले आहे. दीपक बर्डे २५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यांच्या शेतात सध्या दुधीकोहळा, पिवळी ज्वारी, पहलवाणी अशा तीन प्रकारच्या देशी वाणांची ज्वारी उभी आहे. दुधीकोहळा हे १०० दिवसांचे, पिवळी ज्वारी ९०, तर पयलवाणी हे १२० दिवसांचे येणारे पीक आहे.

वडिलोपार्जित हे बियाणे आहे. तेच मी आजही उपयोगात आणले. या पिकांचा खर्च कमी आहे. लोकांना कळल्याने विक्रीची अडचण नाही. भावही चांगला मिळतो.
- दीपक बर्डे, बावापूर

 

 

Web Title : ज्वार भाकरी: पाचन सुधारे, वजन घटाए, चीनी नियंत्रित करे!

Web Summary : ज्वार की भाकरी, वजन प्रबंधन और स्वाद के लिए लोकप्रिय, स्वास्थ्य के लिए फायदेमंद है। यह पाचन में मदद करता है, रक्त शर्करा को नियंत्रित करता है और वजन घटाने में सहायता करता है। किसान इसके स्वास्थ्य लाभ और बाजार की मांग के कारण पारंपरिक ज्वार की खेती की ओर लौट रहे हैं।

Web Title : Jowar Bhakri: Improves Digestion, Aids Weight Loss, Controls Sugar!

Web Summary : Jowar bhakri, a popular choice for weight management and taste, is beneficial for health. It aids digestion, controls blood sugar, and supports weight loss. Farmers are returning to traditional jowar cultivation due to its health benefits and market demand.