Lokmat Agro >शेतशिवार > Jamin Kharedi : जमीन, प्लॉट खरेदी करताय, महिलेच्या नावावर घ्या, विशेष सवलत मिळणार!

Jamin Kharedi : जमीन, प्लॉट खरेदी करताय, महिलेच्या नावावर घ्या, विशेष सवलत मिळणार!

Latest News Jamin Kharedi Special discount on property purchase for women see details | Jamin Kharedi : जमीन, प्लॉट खरेदी करताय, महिलेच्या नावावर घ्या, विशेष सवलत मिळणार!

Jamin Kharedi : जमीन, प्लॉट खरेदी करताय, महिलेच्या नावावर घ्या, विशेष सवलत मिळणार!

Jamin Kharedi : शिवाय महिलेच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यामुळे तिची आर्थिक सुरक्षा मजबूत होते.

Jamin Kharedi : शिवाय महिलेच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यामुळे तिची आर्थिक सुरक्षा मजबूत होते.

शेअर :

Join us
Join usNext

Jamin Kharedi : गावाकडून शहरात आलेल्या प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे असे वाटते. मात्र, प्लॉट व घरांच्या किमती (Plot Buying) दिवसेंदिवस आवाक्याबाहेर चालल्या आहेत. महिलांच्या नावाने प्लॉट असल्यास त्यावर घर बांधकामासाठी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून काही सवलत दिली जाते. त्यामुळे पत्नीच्या नावाने प्लॉट किंवा घर खरेदी (House Buying) करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.

महिलांचा समाजात सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार (Central Government Scheme) महिलांच्या नावावर अनेक योजना राबवत आहे. अनेक गोष्टींमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत सवलत मिळत आहेत. त्यामुळे महिलांच्या नावाने प्लॉट खरेदी करतात. शिवाय महिलेच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यामुळे तिची आर्थिक सुरक्षा मजबूत होते व ती स्वावलंबी बनते. त्यामुळे तिच्या नावाने प्लॉट घेतला जातो.

मुद्रांक शुल्कात सूट
नवीन घराची खरेदी करताना मुद्रांक शुल्क भरावे लागते. घराच्या किमतीनुसार मुद्रांक शुल्क आकारला जातो. हा मुद्रांक शुल्क लाखोंच्या घरात असू शकतो. महिलांना मुद्रांक शुल्कात विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा होत आहे.

व्याजदरात सवलत
भारतात अनेक बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या आहेत, ज्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावाने अनेक जण प्लॉट खरेदी करीत असतात.

महिलांच्या नावाने घर किंवा प्लॉट खरेदी केल्यास गृहकर्जावर महिलांसाठी शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. यामुळे नागरिकांची लाखो रुपयांची बचत होते. परिणामी, अनेक जण महिलांच्या नावाने प्लॉट किंवा घर खरेदी करताना दिसून येत आहेत.
- ईश्वर बहेकार, डेव्हलपर्स किडंगीपार, आमगाव

Web Title: Latest News Jamin Kharedi Special discount on property purchase for women see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.