नाशिक : खरेदी-विक्री होणाऱ्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ (Area of agricultural land) प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल, तर त्या दस्ताला मोजणी नकाशा जोडण्याची आवश्यकता नाही, असे नाशिक विभाग (Nashik), नाशिकचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शेतजमीन खरेदी-विक्री प्रक्रियेत (Jamin Kharedi Vikri) दस्तामध्ये मिळकतीचे ओळख पटण्याइतपत पुरेसे वर्णन नमूद करावे लागते, याबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत दस्तावेज नोंदणीसाठी जी कागदपत्रे आवश्यक ठरत होती, तीच कागदपत्रे सध्याही आवश्यक असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या नव्या नियमानुसार, जर जमिनीच्या दस्तऐवजामध्ये मिळकतीची ओळख पटविण्यासाठी पुरेसे वर्णन नमूद केलेले असेल, तर मोजणी नकाशा जोडण्याची गरज नाही. या संदर्भात कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, यापूर्वी दस्तऐवज नोंदणीसाठी जी कागदपत्रे आवश्यक होती, तीच कागदपत्रे आजही लागू राहतील. कागदपत्रांच्या यादीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे जमीन खरेदी- विक्री करणाऱ्या नागरिकांचा मोजणी नकाशा मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचणार आहे. मात्र, दस्तऐवजामध्ये जमिनीची योग्य ओळख पटविण्यासाठी पुरेसे वर्णन असणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Job Card : घरबसल्या दोन मिनिटात जॉब कार्ड कसे काढायचे? वाचा सविस्तर