lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > Bogus Seed : बोगस बियाणे आढळून आल्यास थेट 'या' नंबरवर तक्रार करा, वाचा सविस्तर

Bogus Seed : बोगस बियाणे आढळून आल्यास थेट 'या' नंबरवर तक्रार करा, वाचा सविस्तर

Latest News If bogus seeds are found report directly on toll free number, read details | Bogus Seed : बोगस बियाणे आढळून आल्यास थेट 'या' नंबरवर तक्रार करा, वाचा सविस्तर

Bogus Seed : बोगस बियाणे आढळून आल्यास थेट 'या' नंबरवर तक्रार करा, वाचा सविस्तर

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांसंदर्भात या नंबरवर तक्रार दाखल करता येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांसंदर्भात या नंबरवर तक्रार दाखल करता येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या घुसखोरीसह अतिरिक्त पैसे आकारण्याच्या तक्रारी लक्षात घेता कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नंबरवर तक्रार दाखल करता येणार आहे. त्यांचे नाव गोपनीय ठेवता येणार आहे. या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या तक्रारीची शहानिशा करून कारवाई होणार आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात २४ लाख पॅकेट कपाशीचे बियाणे लागणार आहे.
यासह विविध पिकांचे बियाणे लागणार आहे. बियाणे विक्री करताना गाव पातळीवर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका आहे. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९४०३२२९९९१ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. या नंबरवर कृषीविषयक तक्रारी शेतकऱ्यांना नोंदविता येणार आहे. यात फोन कॉल फ्रीमध्ये करता येणार आहे. याशिवाय ही संपूर्ण माहिती राज्यस्तरावर नोंदविली जाणार आहे. 

यानंतर जिल्हा स्तरावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. यामुळे तक्रारीतील वास्तव जाणण्याची जबाबदारी कृषी विभागावर येणार आहे. यातून गाव पातळीवरील गैरप्रकार तत्काळ करण्यास मदत होणार आहे. हा क्रमांक शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारा राहणार आहे. टोल फ्री क्रमांकामुळे कृषी विभागाला वेळेपूर्वीच गैरप्रकाराची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे. यामुळे हा टोल फ्री क्रमांक सर्वांनाच उपयोगी पडणार आहे.


बोगस बीटी अन् खत

बोगस बीटी बियाण्याची घुसखोरी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात होते. यासाठी छुप्या मार्गाचा अवलंब होतो. टोल फ्री नंबरमुळे शेतकऱ्यांना याविषयाची गोपनीय माहती देता येणार आहे. यातून बोगस बीटी अथवा बोगस खतासारख्या प्रकाराला रोखता येणार आहे.

Web Title: Latest News If bogus seeds are found report directly on toll free number, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.