Lokmat Agro >शेतशिवार > HTBT Cotton Seed : HTBT बियाण्यांची गुपचूप विक्री; कृषी विभागाची उघड कारवाई वाचा सविस्तर

HTBT Cotton Seed : HTBT बियाण्यांची गुपचूप विक्री; कृषी विभागाची उघड कारवाई वाचा सविस्तर

latest news HTBT Cotton Seed: Secret sale of HTBT seeds; Read the open action of the Agriculture Department in detail | HTBT Cotton Seed : HTBT बियाण्यांची गुपचूप विक्री; कृषी विभागाची उघड कारवाई वाचा सविस्तर

HTBT Cotton Seed : HTBT बियाण्यांची गुपचूप विक्री; कृषी विभागाची उघड कारवाई वाचा सविस्तर

HTBT Cotton Seed : खरीप हंगामाची लगबग सुरू असतानाच, विदर्भातील शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं ठाकलंय आहे. परवानगी नसलेली HTBT कापूस बियाण्यांची गुपचूप विक्रीस सुरू आहे. यामुळे कृषी विभाग 'अलर्ट मोड'वर असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापे सुरू आहेत. (HTBT Cotton Seed)

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगाम सुरू होत असतानाच विदर्भातील शेतकऱ्यांपुढे नव्या चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. प्रतिबंधित व परवानगी नसलेली HTBT (Herbicide Tolerant Bt) कापूस बियाणे बाजारात खुलेआम विक्रीस लागल्याचे समोर आले आहे.(HTBT Cotton Seed)

यामुळे कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर गेला असून, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि जळगाव जिल्ह्यांसह मराठवाड्यातही धडक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. (HTBT Cotton Seed)

वाढत्या मागणीचा गैरफायदा

राज्यात दरवर्षी खरीप हंगामात सुमारे २.५ ते ३ कोटी पॅकेट्स कापूस बियाण्यांची आवश्यकता असते. यंदा कापसाची लागवड वाढण्याची शक्यता असल्यामुळे मागणीही लक्षणीय वाढली आहे. 

परिणामी, अधिकृत बियाण्यांचा तुटवडा भासू लागला असून त्याचा गैरफायदा घेत बनावट व प्रतिबंधित बियाण्यांचा गुप्त व्यवहार तेजीत सुरू आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, सुमारे २० टक्के बियाण्यांमध्ये HTBT बियाण्यांची भेसळ असण्याची शक्यता आहे. हे बियाणे मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश अशा सीमावर्ती राज्यांतून गुप्त मार्गांनी महाराष्ट्रात आणले जात असल्याचे उघड झाले आहे.

कृषी विभागाची धडक मोहीम

राज्य शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी विभागाला निर्देश दिले असून, विविध जिल्ह्यांमध्ये भरारी पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी, बुलढाणा जिल्ह्यात एका ठिकाणी, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत अनधिकृत बियाण्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी बियाण्याचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत.

HTBT बियाणे म्हणजे काय?

HTBT म्हणजे Herbicide Tolerant Bt Cotton. ही बियाण्यांची जात भारत सरकारने अधिकृतपणे मंजूर केलेली नाही. त्यामुळे याचा वापर किंवा विक्री दोन्ही बेकायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिक जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो.

शासनाची स्पष्ट भूमिका

केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, HTBT कापूस बियाण्यांचा वापर व विक्री बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा बियाण्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवरही कारवाई होऊ शकते.

शेतकऱ्यांनो सावध राहा

शेतकऱ्यांनी फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी केवळ अधिकृत बियाणे दुकानांमधूनच खरेदी करावी व प्रत्येक खरेदीचे बिल घ्यावे. - राजेश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष, कृषी साहित्य विक्रेता संघटना 

प्रतिबंधित HTBT बियाणे शेतकऱ्यांसाठी तसेच पर्यावरणासाठी घातक आहेत. जर कुणी व्यक्ती अशी बियाणे विक्री करताना दिसली, तर तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. - सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी, खामगाव 

हे ही वाचा सविस्तर : HTBT Cotton Seed : शेतकऱ्याच्या घरून कापसाचे प्रतिबंधित बियाणे जप्त; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Web Title: latest news HTBT Cotton Seed: Secret sale of HTBT seeds; Read the open action of the Agriculture Department in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.