Pik Vima Manjur : महाराष्ट्र शासनाने नुकताच खरीप २०२४, रब्बी हंगाम २०२४-२५ चा पिक विमा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमचा पिक विमा मंजूर आहे का आणि मंजूर असेल तर किती रक्कम मंजूर आहे, याबाबत मोबाईलवरून दोन मिनिटांत कसं पाहायचं, हे पाहुयात.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल, म्हणजेच क्रोम, गुगल किंवा इतर या ब्राउझरवर जाऊन PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे सर्च करायचा आहे.
- यानंतर तुम्हाला समोर पीक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट दिसून येईल. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारचे पर्याय दिसून येतील.
- यातील Farmer Corner या पर्यायावर क्लिक करावे. फार्मर कॉर्नरवर गेल्यानंतर लॉगिन करणे आवश्यक आहे.
- यातील लॉगिन फॉर फार्मर या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या कोड दिलेला आहे, तो टाकायचा आहे.
- त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी एंटर करायचा आहे.
- यानंतर आपल्यासमोर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दिसून येईल. शेतकऱ्याचे नाव, पॉलिसी नंबर यासह इतर माहिती दिसून येईल.
- पॉलिसी नंबरच्या ठिकाणी पॉलिसीची माहिती दिसून येईल. जर समजा तुम्ही खरीप २०५ २ची पॉलिसी घेतली असेल तर ती पाहता येईल.
- त्या पॉलिसीवर क्लिक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती पाहता येईल.
- हे पाहत असताना शेवटी तुम्हाला View या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यानंतर आपल्यासमोर दुसरी विंडो ओपन होणार आहे.
- त्यामध्ये संबंधित पॉलिसीबाबत माहिती दिली जाते, पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले आहे की नाही ते दाखवले जाते.
- पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले असेल तर पुढे नुकसानीची टक्केवारी, पीक विम्याची रक्कम किती मंजूर झाले आहे, ते दाखवले जाते.
अशा पद्धतीने तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमचा पिक विमा मंजूर आहे की नाही, आहे तर किती भरपाई मिळणार आहे, याबाबतची माहिती काही मिनिटात मोबाईलद्वारे घेता येईल.
खरीप २०२४, रब्बी हंगाम २०२४-२५ पिक विमा मंजुरीचा शासन निर्णय आला, 'या' तारखेपासून पैसे वाटप
