Lokmat Agro >शेतशिवार > Nano DAP Sale : महाराष्ट्रात नॅनो डीएपीची विक्री किती झाली? आता किसान समृद्धी केंद्रांवरही उपलब्ध

Nano DAP Sale : महाराष्ट्रात नॅनो डीएपीची विक्री किती झाली? आता किसान समृद्धी केंद्रांवरही उपलब्ध

Latest News How much was sale of Nano DAP in Maharashtra use nano dap an urea | Nano DAP Sale : महाराष्ट्रात नॅनो डीएपीची विक्री किती झाली? आता किसान समृद्धी केंद्रांवरही उपलब्ध

Nano DAP Sale : महाराष्ट्रात नॅनो डीएपीची विक्री किती झाली? आता किसान समृद्धी केंद्रांवरही उपलब्ध

Nano DAP Sale : आता नॅनो युरिया (Nano Urea) प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांवर उपलब्ध करून दिला जात आहे. 

Nano DAP Sale : आता नॅनो युरिया (Nano Urea) प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांवर उपलब्ध करून दिला जात आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Nano DAP Sale : देशात आतापर्यंत नॅनो डीएपीची जवळपास 181.25 लाख बॉटलची विक्री झालेली आहे. यात महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी सर्वाधिक विक्री झाली आहे. संबंधित कंपन्यांकडून नॅनो युरिया (Nano Urea) प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांवर उपलब्ध करून दिला जात आहे. 

शेतकऱ्यांमध्ये नॅनो खतांच्या (Nano Fertilizers) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, अनेक पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये जागरूकता शिबिरे, वेबिनार, नुक्कड नाटक, क्षेत्रीय प्रात्यक्षिके, किसान संमेलने आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रपट यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून  नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिले जाते.

भारतीय मृदा विज्ञान संस्था, भोपाळ च्या माध्यमातून आयसीएआरने (ICAR) अलीकडेच “खताचा कार्यक्षम आणि संतुलित वापर (नॅनो-फर्टिलायझर्ससह)” या विषयावर राष्ट्रीय मोहीम आयोजित केली होती. 15 नोव्हेंबर  2023 रोजी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत नॅनो खतांचा वापराला प्रोत्साहन देण्यात आले.

नॅनो डीएपीची राज्यांतर्गत विक्री 

याचबरोबर देशातील त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांना नॅनो डीएपीच्या 500 एमएलच्या बॉटल्सच्या विक्रीचा अहवाल पाहिला तर आंध्र प्रदेशात 10.57 लाख, आसाम 1.42 लाख, बिहार 5.31 लाख, छत्तीसगड 2.46 लाख, गुजरात 9.13 लाख, हरियाणा आणि दिल्ली 2.35 लाख, हिमाचल प्रदेश 0.83 लाख, जम्मू आणि काश्मीर 0.73, लाख झारखंड 0.71 लाख, कर्नाटक 13.17 लाख, केरळ 0.33 लाख, मध्य प्रदेश 18.75 लाख, महाराष्ट्र आणि गोवा 35.39 लाख, ओडीसा 3.58 लाख, पंजाब 6.88 लाख, राजस्थान 12.89 लाख, तामिळनाडू 4.5 लाख, तेलंगणा 7.8 लाख, उत्तर प्रदेश 31.48 लाख अशी एकूण 181.25 लाख ज्ञानू डीएपीच्या बॉटल ची विक्री झालेली आहे.

Grape Crop Management : द्राक्षावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी काही सोप्या टिप्स, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News How much was sale of Nano DAP in Maharashtra use nano dap an urea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.