Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > दोन एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी करण्यास किती खर्च येतो अन् वेळ किती लागतो? वाचा सविस्तर

दोन एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी करण्यास किती खर्च येतो अन् वेळ किती लागतो? वाचा सविस्तर

Latest news How much does it cost to spray two acres of land with a drone | दोन एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी करण्यास किती खर्च येतो अन् वेळ किती लागतो? वाचा सविस्तर

दोन एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी करण्यास किती खर्च येतो अन् वेळ किती लागतो? वाचा सविस्तर

Drone spraying : शेतीत तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून ड्रोनद्वारे फवारणी ही आधुनिक शेतीतील नवी क्रांती ठरत आहे.

Drone spraying : शेतीत तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून ड्रोनद्वारे फवारणी ही आधुनिक शेतीतील नवी क्रांती ठरत आहे.

नाशिक : शेतीत तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून ड्रोनद्वारे फवारणी ही आधुनिक शेतीतील नवी क्रांती ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळ, खर्च आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून उत्पादनक्षमतेतही वाढ होत असल्याचे चित्र कळवण तालुक्यात दिसून येत आहे. 

अवघ्या १५ मिनिटांत दोन एकर क्षेत्रावर फवारणी आणि एकरी केवळ ६०० रुपये इतका खर्च, या सुविधेमुळे कळवण तालुक्यातील शेतकरी कांदा पिकासाठी मोठ्या प्रमाणात ड्रोन फवारणीकडे वळत आहेत. मजुरांची टंचाई, वाढता मजुरी खर्च आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. 

ड्रोनच्या साहाय्याने कांदा, मका व ऊस या पिकांवर प्रभावी फवारणी केली जात आहे. ११ लिटर क्षमतेची टाकी असलेला ड्रोन कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर अचूक व समान प्रमाणात फवारणी करतो. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ही प्रक्रिया जलद, कमी कष्टाची आणि अधिक परिणामकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

ड्रोन फवारणीसाठी एकरी सुमारे ६०० रुपये भाडे आकारले जात असल्याने कमी खर्चात आधुनिक सुविधा उपलब्ध होत आहे. या ड्रोनची बाजारातील किंमत सुमारे ५ ते ६ लाख रुपये असून वाहतुकीसाठी 'छोटा हत्ती' रिक्षाचा वापर करण्यात येतो. वेळेची बचत, खर्चात कपात आणि फवारणीतील अचूकता यामुळे शेतकऱ्यांचा ड्रोन शेतीकडे कल वाढत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ड्रोन फवारणी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कमी वेळेत जास्त क्षेत्रावर फवारणी होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ, कष्ट आणि खर्च वाचतो. भविष्यात ड्रोन तंत्रज्ञान शेतीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ड्रोन फवारणीमुळे शेतीत आधुनिकतेची पावले पडत असून पाळे खुर्द परिसरातील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहताना दिसत आहेत.
- संजय देशमुख, शेतकरी, पाळे बुद्रुक

Web Title : दो एकड़ में ड्रोन से छिड़काव का खर्च और समय: पूरी जानकारी

Web Summary : ड्रोन से छिड़काव खेती में क्रांति ला रहा है, समय, पानी और श्रम की बचत हो रही है। दो एकड़ में 15 मिनट में ₹600 प्रति एकड़ की दर से छिड़काव किया जा सकता है। कलवान के किसान प्याज, मक्का और गन्ना जैसी फसलों के लिए इसे अपना रहे हैं, जिससे लागत कम हो रही है और दक्षता बढ़ रही है।

Web Title : Drone Spraying Cost & Time for Two Acres: Details Here

Web Summary : Drone spraying revolutionizes farming, saving time, water, and labor. Two acres can be sprayed in 15 minutes for ₹600/acre. Farmers in Kalvan are adopting it for crops like onions, maize and sugarcane, reducing costs and improving efficiency.