Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कांदा, टोमॅटो, ज्वारी, सोयाबीनला प्रतिहेक्टर किती रुपयांचे पीक कर्ज मिळणार? वाचा सविस्तर 

कांदा, टोमॅटो, ज्वारी, सोयाबीनला प्रतिहेक्टर किती रुपयांचे पीक कर्ज मिळणार? वाचा सविस्तर 

Latest news How much crop loan per hectare will be available for onion, tomato, jowar, soybean? Read in detail | कांदा, टोमॅटो, ज्वारी, सोयाबीनला प्रतिहेक्टर किती रुपयांचे पीक कर्ज मिळणार? वाचा सविस्तर 

कांदा, टोमॅटो, ज्वारी, सोयाबीनला प्रतिहेक्टर किती रुपयांचे पीक कर्ज मिळणार? वाचा सविस्तर 

Pik Karj Vatap : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत.

Pik Karj Vatap : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत.

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत. कापसापासून द्राक्षांपर्यंत आणि सोयाबीनपासून उसापर्यंत जवळपास सर्वच पिकांच्या कर्जमर्यादेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 

कांदा, टोमॅटो यांसारख्या पिकांसाठी प्रतिहेक्टर १.२५ लाख ते १.८० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. जिल्ह्यात सोयाबीन, मक्याचे क्षेत्र अधिक असले तरी या पिकाला मिळणारे कर्ज देण्यासाठी मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत. कापसाला हेक्टरी ७८ हजार ७५० रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पीककर्जाच्या मर्यादेत वाढ
पीककर्ज वितरणासाठी कर्जवाटपाची मर्यादा १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढलेली मर्यादा मूळ रकमेवर ठरविण्यात आली आहे.

ज्वारी, सोयाबीनला ४२ हजारांचे कर्ज
४२ हजार ७०० रुपये हेक्टरी कर्ज सोयाबीन व ज्वारीला मिळते. तर तुरीला ६६ हजारांचे पीक कर्ज मंजूर केले आहे. सोबतच धान, मूग, उडीद, भुईमूग या पिकांनाही वाढीव कर्ज मंजूर केले आहे. मिरची पिकाला एक लाख २६ हजार, केळी १ लाख ८९ हजार, पपई १ लाख ७हजार, भाजीपाला व कांदा १ लाख ८०० रुपये, डाळिंब १ लाख ५२ हजार २००, रु.चे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

फळबाग उत्पादकांना आधार
फळबागा हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विषय असतो. संत्रा, मोसंबी, आंबा, केळी, द्राक्षे आणि डाळिंब यांसारख्या बागांच्या देखभालीसाठी मोठा खर्च येतो. नवीन नियमांनुसार, या फळबागांसाठी प्रतिहेक्टर कर्जमर्यादा आता १.२५ लाख ते २.५० लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 

पीक हेक्टरी कर्ज मर्यादा

  • कापूस ओलीत - ७८ हजार ७५० रुपये 
  • कापूस कोरडवाहू - ६३ हजार रुपये 
  • सोयाबीन- ६८ हजार २०० रुपये 
  • तूर - ६६ हजार रुपये 
  • ज्वारी - ४२ हजार ७०० रुपये 
  • मूग - ३७ हजार ५०० रुपये 
  • उडीद - ३७ हजार ५०० रुपये 

 

 

Web Title : फसल ऋण: प्याज, टमाटर, ज्वार, सोयाबीन के लिए प्रति हेक्टेयर सीमा

Web Summary : महाराष्ट्र ने 2026-27 के लिए फसल ऋण सीमा 10-25% बढ़ाई। प्याज, टमाटर ऋण ₹1.8 लाख/हेक्टेयर तक पहुंचे। ज्वार, सोयाबीन को ₹42,700 मिले। फल फसलों को ₹2.5 लाख/हेक्टेयर।

Web Title : Crop Loan: Per Hectare Limit for Onion, Tomato, Jowar, Soybean

Web Summary : Maharashtra increases crop loan limits 10-25% for 2026-27. Onion, tomato loans reach ₹1.8 lakh/hectare. Jowar, soybean get ₹42,700. Fruit crops see ₹2.5 lakh/hectare.