Nuksan Bharpai : अलीकडच्या काही वर्षात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात पशुधनासह मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यामुळे राज्यातील बिबट क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आहे.
महाराष्ट्र शासनाकडून वन्य प्राणी हल्ल्यांमध्ये झालेल्या मनुष्यहानी व पाळीव प्राणी यांच्या हानीस देय नुकसान भरपाई- वाघ, बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेली मानवी जीवितहानी किंवा पशुधनाला झालेली कोणतीही इजा याकरिता प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईचे निकष काय आहेत, ते समजून घेऊयात.
- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे देय नुकसानभरपाईचे दर
| क्रमांक | हानीचा प्रकार | नुकसान भरपाईचा दर (रु.) |
|---|---|---|
| 1 | मानवी जीवितहानी | २५ लाख रुपये |
| 2 | मानवास आलेले कायमस्वरूपी अपंगत्व | ७ लाख ५० हजार रुपये |
| 3 | मानवाला झालेली गंभीर इजा | ५ लाख रुपये |
| 4 | मानवाला झालेली किरकोळ इजा | खाजगी रुग्णालयातील उपचार खर्च किंवा ५०,००० (जे कमी असेल) |
ब) वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती किंवा जंगली कुत्रा यांच्या हल्ल्यामुळे झालेली पशू जीवांची हानी किंवा त्यांना पोहचलेली इजा यांकरिता प्रदेय असलेल्या नुकसानभरपाईचा दर पुढीलप्रमाणे असेल.
| अक्र. | पशुधनाचा प्रकार | नुकसानाचा प्रकार | नुकसानभरपाईचा दर (रु.) |
|---|---|---|---|
| 1 | गाय, म्हैस, बैल | जीवित हानी | बाजारभावाचे ७५% किंवा ७० हजार रुपये (जे कमी असेल ते) |
| 2 | मेंढी, शेळी व इतर | जीवित हानी | बाजारभावाचे ७५% किंवा १५ हजार रुपये (जे कमी असेल ते) |
| 3 | गाय, म्हैस, बैल | कायमस्वरूपी विकलांगता | बाजारभावाचे ५०% किंवा १५ हजार रुपये (जे कमी असेल ते) |
| 4 | गाय, म्हैस, बैल, मेंढी, शेळी | इजा | जखमी झालेल्या पशुच्या उपचारासाठी केलेला वैद्यकीय खर्च प्रदान करण्यात येईल. जखमी पशूचा उपचार, शासकीय किंवा जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालयात करण्यात येईल. प्रदेय असलेली रक्कम पशुच्या बाजार किंमतीच्या पंचवीस टक्के किंवा फक्त पाच हजार रुपये यांपैकी जी कमी असेल तितकी या मयदित असेल. |
अशा पद्धतीने शासनाकडून नुकसान भरपाईचे निकष सांगितले आहेत. जर तुमच्याही पशुधनाला वन्यप्राणी हल्ल्यात जीव गमवावा लागला असेल किंवा इजा झाली असल्यास जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन भेट द्या.
