Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अधिक उत्पादनाकरिता फळबागेचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन समजून घेऊया, वाचा सविस्तर 

अधिक उत्पादनाकरिता फळबागेचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन समजून घेऊया, वाचा सविस्तर 

Latest News Horticulture Farming Let's understand the technical management of orchards for more production | अधिक उत्पादनाकरिता फळबागेचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन समजून घेऊया, वाचा सविस्तर 

अधिक उत्पादनाकरिता फळबागेचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन समजून घेऊया, वाचा सविस्तर 

Horticulture Farming : धान, कडधान्य, भाजीपाला उत्पादनाबरोबरच फळबागेचे नियोजन शेतकऱ्यांना फलदायी ठरत आहे.

Horticulture Farming : धान, कडधान्य, भाजीपाला उत्पादनाबरोबरच फळबागेचे नियोजन शेतकऱ्यांना फलदायी ठरत आहे.

भंडारा : शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पादनात वाढ होण्याकरिता विविध अंगाने शेतीत उत्पादनाची नितांत गरज आहे. धान, कडधान्य, भाजीपाला उत्पादनाबरोबरच फळबागेचे नियोजन शेतकऱ्यांना फलदायी ठरत आहे. आंबा व पेरू बागेची लागवड अधिक आहे. 

बागेची विशेष काळजी घेण्याकरिता आंबा फळबागांचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन साधण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी केले आहे. साकोली उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी पालांदूर येथील फळबागात शिवारफेरी अंतर्गत उपस्थिती दर्शविली. 

घन लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी फायद्याची
घन लागवड पद्धतीमुळे बागेची योग्य पद्धतीने निगा राखण्याकरिता मोठी मदत होत आहे. बाग स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याकरिता घन लागवड पद्धत वापरली जात आहे. यामुळे फळबाग स्वच्छ राहून रोगराईचे प्रमाण कमी होण्यास मोलाची मदत मिळते.

फळबाग लागवडीची पद्धत
पाच बाय पाच मीटर अंतरावर आंबा फळबागांचे घन पद्धतीने लागवड करावी. झाडांना मर्यादित आकार देण्याकरिता छाटणीकडे लक्ष द्यावे. नवीन लागवड केलेल्या कलमांची वाढ अडीच फुटांपर्यंत फांद्या फुटू देऊ नयेत. मुख्य खोडाची दोन फूट उंचीवर छाटणी करावी. त्यानंतर आलेल्या फांद्यामधून मजबूत व समांतर अशा तीन फांद्या ठेवाव्यात.

कीडमुक्त बाग गरजेची
नियमितपणे बागेत लक्ष देणे गरजेचे आहे. ऊन, वारा, पाऊस यांचा नकारात्मक परिणाम बागेवर शक्य आहे. त्यामुळे वेळोवेळी लक्ष देऊन शिफारसीनुसार फवारणी करावी. बुरशीनाशकामध्ये कापर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के प्रवाही २५ ग्रॅम किंवा आणखी इतर बुरशीनाशक शिफारसीनुसार फवारावे. जवळच्या कृषी सहायकांशी संपर्क साधावा.

Web Title : अधिक उपज के लिए फल बाग प्रबंधन में महारत हासिल करें: एक विस्तृत गाइड

Web Summary : व्यवस्थित बाग प्रबंधन से फलों का उत्पादन बढ़ाएँ। उप-विभागीय कृषि अधिकारी आम और अमरूद के लिए घनी रोपाई की सलाह देते हैं, इष्टतम विकास और उपज के लिए छंटाई, कीट नियंत्रण और नियमित निगरानी पर जोर देते हैं। मार्गदर्शन के लिए कृषि सहायकों से परामर्श करें।

Web Title : Mastering Fruit Orchard Management for Higher Yields: A Detailed Guide

Web Summary : Increase fruit production with systematic orchard management. Sub-Divisional Agriculture Officer advises dense planting for mango and guava, emphasizing pruning, pest control, and regular monitoring for optimal growth and yield. Consult agricultural assistants for guidance.