नाशिक : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मधाचे गाव ही योजना खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे (Khadi Village Industries Board) राबवली जात आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwer) चाकोरे गावाचा समावेश करण्यात आला आहे. या गावासाठी ४०.२२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, योजनेसाठी एकूण ५ कोटी १ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिशय घनदाट जंगलात वसलेले, गावाला लागूनच गौतमी गोदावरी (Gautami Godawari) नदीचा प्रवास असलेले चाकोरे गाव. अगदी कमी लोकसंख्या असलेल्या गाव. मात्र पाण्याची उपलब्धता या गावासाठी संजीवनी ठरत आहेत. बाराही महिने भाजीपाला पिकांची शेती होत आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्यातील एक महत्वाचं ठिकाण म्हणून चाकोरे गावची ओळख आहे.
शिवाय चाकोरे गावाला लाभलेली घनदाट जंगलसंपदा, त्यातील साग, औषधी वनस्पती, फुलझाडे व मधासाठी उपयुक्त झाडे ही योजनेसाठी उपयुक्त ठरली आहेत. या ठिकाणी निर्भेळ व शुद्ध मधाचे उत्पादन शक्य असल्यानेच चाकोरेची निवड करण्यात आली आहे. मधमाश्यांचे पालन हा एक महत्त्वाचा ग्रामीण जोडधंदा ठरतो आहे. या व्यवसायातून केवळ मध आणि मेणच नव्हे तर शेती उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होते. गावाच्या सकल उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते.
नोडल एजन्सी म्हणून खादी ग्रामोद्योग मंडळ
राज्यात खादी ग्रामोद्योग विभाग योजनेची नोडल एजन्सी असणार आहे. योजना राबवण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देत स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. यातुन विविध रोजगाराच्या संथी तरुणांना मिळतील.
योजनेची वैशिष्ट्ये, अंमलबजावणी पद्धती
मधासाठी उपयुक्त वनस्पती लागवड
मधमक्षिका पालन, संकलन, २ प्रक्रिया, बँडिंग व विक्री यांची संपूर्ण साखळी उभारणी
ग्रामपंचायतीमार्फत वीज व इतर 3 सोयी
मधमाशीपालनाच्या पेट्या, प्रशिक्षण व बाजार व्यवस्था
लाभार्थीना एक वर्ष प्रशिक्षण आणि त्यानंतर ग्रामोद्योगाची जबाबदारी