Lokmat Agro >शेतशिवार > Herbicide Spray: तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर

Herbicide Spray: तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर

latest news Herbicide Spray: Right time for weed control; Read Agriculture Department's advice to farmers in detail | Herbicide Spray: तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर

Herbicide Spray: तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर

Herbicide Spray : खरीप हंगामातील पेरण्या जोमाने सुरू असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तणनाशकांची निवड व वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Herbicide Spray)

Herbicide Spray : खरीप हंगामातील पेरण्या जोमाने सुरू असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तणनाशकांची निवड व वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Herbicide Spray)

शेअर :

Join us
Join usNext

Herbicide Spray : मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीनच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात सुरू असून, याच टप्प्यावर शेतकऱ्यांना तण नियंत्रणासाठी योग्य पद्धती आणि योग्य वेळेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. (Herbicide Spray)

तणांच्या अतिरीक्त वाढीमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना ४८ तासांच्या आत योग्य प्रमाणात तणनाशक फवारणीचा सल्ला दिला असून, शुद्ध पाणी व अचूक औषधांच्या वापरावरही भर देण्यात आला आहे. आता फक्त एकच धोरण. वेळेवर फवारणी आणि उत्पादनात वाढ होईल. (Herbicide Spray)

खरीप हंगामातील पेरण्या तालुक्यात जोमाने सुरू असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तण नियंत्रणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तणनाशकांची निवड व वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Herbicide Spray)

फवारणीची योग्य वेळ महत्त्वाची

तणनाशकांचा प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी, पेरणीनंतर ४८ तासांच्या आत तणनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. यामुळे तणांचा पिकावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखता येतो.

शिफारस केलेली तणनाशके व प्रमाण

* पेरणीनंतर ४८ तासांच्या आत फवारणीसाठी: फ्लूमिओक्साजिन ५०% SC – १०० मिली प्रति एकर

गवत व रुंद पानांच्या तणांचे प्रभावी नियंत्रण.

पेंडिमिथलीन ३०% EC – ७५० ते १००० मिली प्रति हेक्टर - प्रति पंप ३०-४० मिली प्रमाणे.

सल्फेंटराझोन २८% + क्लोमाझोन ३०% WP – ५०० ग्रॅम प्रति एकर

डिक्लोसुलम ८४% – १२.४ ग्रॅम प्रति एकर

उगवणीनंतर तण नियंत्रणासाठी फवारणी

इमेझीथायपर १०% SL – ८०० मिली प्रति एकर (प्रति पंप ८०-१०० मिली)

फ्लूझिफॉप पी-ब्युटील १३.४% EC - फक्त सोयाबीनसाठी – ४०० ते ५०० मिली प्रति एकर

इमाझीथायपर ३५% + इमॅझामॉक्स ३५%- सोयाबीन व भुईमूगमधील सर्व तणांसाठी – ४० ग्रॅम प्रति एकर

सोडियम सीफ्लुरफेन १६५% + क्लोडीनाफॉप प्रोपर्जील ८% – ४०० मिली प्रति एकर

फोमेसफेन १२% + क्विझालोफॉप इथिल ३% – ६०० मिली प्रति एकर

फवारणीसाठी विशेष सूचना

* फवारणीसाठी फक्त स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

* डबके, नाला किंवा माती मिसळलेले पाणी टाळावे.

* सोयाबीन २ ते ४ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी अधिक प्रभावी ठरते.

फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर अनिवार्य आहे. माती मिसळलेले, डबके किंवा नाल्याचे पाणी वापरू नये. पीक २ ते ४ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करणे परिणामकारक ठरते.- दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Amarvel : अमरवेलचा विळखा : पिकांची हानी, नियंत्रणासाठी 'या' करा उपायायोजना

Web Title: latest news Herbicide Spray: Right time for weed control; Read Agriculture Department's advice to farmers in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.