Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Healthy Juice : हिवाळ्यात फायदेशीर ठरतील शेवगा, आवळा अन् दुधीच्या ज्यूसचे 'हे' पाच फायदे

Healthy Juice : हिवाळ्यात फायदेशीर ठरतील शेवगा, आवळा अन् दुधीच्या ज्यूसचे 'हे' पाच फायदे

Latest News Healthy Juice These five benefits of Shevga, Amla and Milk Juice will be beneficial in winter | Healthy Juice : हिवाळ्यात फायदेशीर ठरतील शेवगा, आवळा अन् दुधीच्या ज्यूसचे 'हे' पाच फायदे

Healthy Juice : हिवाळ्यात फायदेशीर ठरतील शेवगा, आवळा अन् दुधीच्या ज्यूसचे 'हे' पाच फायदे

Healthy Juice :

Healthy Juice :

नाशिक : गुलाबी थंडीची चाहूल लागताच जॉगिंग ट्रॅक पुन्हा एकदा बहरले आहेत. त्यामुळे फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. यामध्ये शेवगा, आवळा, दुधी भोपळ्याच्या ज्यूसला पसंती दिली जात आहे, कारण या ज्यूसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

थंडीची चाहूल लागल्यापासून व्यायामासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. या दिवसांत फळांचे ज्यूस देखील शरीरासाठी उपयुक्त असल्याने विक्री वाढली आहे. यामध्ये कडधान्य आणि फळभाज्यांपासून बनवलेला आयुर्वेदिक रस, गव्हाचा, आवळ्याचा, तुळशीचा, पुदिन्याचा, कडुनिंबाचा, दुधी भोपळा, बीट, शेवगा आणि आले यासारख्या घटकांपासून बनवलेले हे रस विक्री होत आहे.

गव्हाच्या ज्यूसचे फायदे 
गव्हाच्या रसासाठी सात दिवसांची कोवळी रोपे तयार करून त्यापासून रस काढला जातो. हा रस रक्तवाढीस मदत करतो; तर आवळा व्हिटॅमिन-सी देतो, तुळशी श्वसनाच्या विकारांवर लाभदायी ठरते, बीट रक्तवाढीसाठी, दुधी शक्तीवर्धक, पुदिन्याचा रस पोटातील उष्णता कमी करत असल्याने नागरिकांकडून पसंती मिळते.

इतर ज्यूसचे फायदे 

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते : आवळा आणि दुधी भोपळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • पचन सुधारते : फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
  • वजन कमी करण्यास मदत करते : यात फायबर आणि कमी कॅलरीज असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • शरीरातील विषारी घटक बाहेर काढते : हा ज्यूस शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो.
  • हाडे मजबूत करते : दुधी भोपळ्यामध्ये लोह आणि पोटॅशियम असते जे हाडे मजबूत करतात. 

 

हेही वाचा : मोबाईलचा वापर करून शेत जमीन मोजता येईल, ते कसं, जाणून घ्या सोप्या शब्दांत 

Web Title: Latest News Healthy Juice These five benefits of Shevga, Amla and Milk Juice will be beneficial in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.