Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा कहर, सावलीत बसून मिरची काढणी, मजुरांसाठी शेतकऱ्याचे भन्नाट जुगाड, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:40 IST

Agriculture News : वाढत्या उन्हामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

Agriculture News :    उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा परिणाम शेतीच्या कामांवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

अशा कठीण परिस्थितीत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष गावातील शेतकरी निवृत्ती बुधा ढोले यांच्या शेतात मिरची पिकाची काढणी जोरात सुरू आहे. कडक उन्हापासून संरक्षण मिळावे, म्हणून मजूर छत्र्यांचा वापर करून मिरची काढणीचे काम करताना दिसत आहेत. 

दुसरीकडे राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अशा परिस्थितीत बाहेर निघणे देखील कठीण झाले आहेत. त्यामुळे उन्हात काम करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे. मात्र एवढं ऊन असूनही शेतकरी शेतात काम करीत आहेत. सध्या मिरची काढणी सुरु  ढोले यांनी मजुरांना सावलीत काम करण्यासाठी भन्नाट जुगाड लावले आहे. 

मिरची काढणीसाठी आलेल्या मजुरांना सावलीसाठी मोठं मोठ्या छत्र्या शेतात ठेवल्या आहेत. जेणेकरून सावलीत बसून मिरची काढणी करता येईल. यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, मजुरांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

अनेक ठिकाणी शेतमजूर डोक्यावर कापड, टोपी किंवा छत्री घेऊन काम करत आहेत. उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या वेळेत शेतात उभे राहणेही कठीण होत असताना, शेतकरी आणि मजूर मेहनतीने काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यंदा मिरचीचे पीक चांगलेवावी हर्ष परिसरात यंदा मिरचीचे पीक चांगले आले असून, उत्पादनही समाधानकारक मिळत आहे. शेतकरी निवृत्ती बुधा ढोले यांनी मिरची लागवड केली होती. योग्य पाणी व्यवस्थापन, वेळेवर फवारणी आणि सातत्याने केलेली निगा यामुळे पिकाची गुणवत्ता उत्तम राहिली आहे. आता काढणीच्या टप्प्यावर आलेल्या या पिकामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात मिरचीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

 

 

PM Kisan Scheme : नवीन शेती घेतली आहे तर, आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का? काय आहेत नियम

 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's ingenious solution: Harvesting chilies under shade during heatwave.

Web Summary : A farmer in Nashik devised a clever solution to protect laborers harvesting chilies from the intense heat. He provided large umbrellas, allowing them to work in the shade. Despite the challenging conditions, the chili crop is thriving, bringing satisfaction to the farmer.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमिरचीनाशिक