यवतमाळ : रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ज्वारी, बाजरी, मका आणि रागी खरेदीसाठी जिल्ह्यातील नऊ हमी खरेदी केंद्रांना शासनाने मुदतवाढ दिली आहे.(Hamibhav Kharedi)
शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत आता १५ मेपर्यंत वाढविण्यात आली असून नोंदणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.(Hamibhav Kharedi)
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब आणि राळेगाव येथे हमी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.(Hamibhav Kharedi)
या केंद्रांवर शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, मका आणि रागी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
या केंद्रांचा समावेश
खरेदी प्रक्रियेसाठी तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागाव, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, घाटंजी, कळंब आणि राळेगाव यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच पाटण येथील बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथील शेतकरी कृषी खासगी बाजार केंद्राद्वारेही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन नोंदणी करताना शेतकऱ्यांना आधारकार्ड, ७/१२ उतारा, पीकपेरा आणि बँक पासबुकची स्पष्ट झेरॉक्स प्रत सादर करावी लागणार आहे. संबंधित खरेदी केंद्रावर स्वतः उपस्थित राहून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रतिसाद कमी; म्हणून मुदतवाढ
शासनाने सुरुवातीला १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत नोंदणी प्रक्रिया राबविली होती. मात्र, अनेक भागांतून शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने शासनाने ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १५ मेपर्यंत नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा मार्केटिंग विभागाचे अधिकारी विजय गाढवे यांनी शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तत्काळ संबंधित केंद्रावर जाऊन नोंदणी पूर्ण करावी, असे सांगितले आहे.
अधिक वाचा : Tur Kharedi : तूर खरेदीची मुदत वाढली; अजून किती दिवस मिळाले? लगेच जाणून घ्या
Web Summary : Yavatmal extends guaranteed price purchase registration for crops like Jowar until May 15th. Farmers are urged to register at designated centers with necessary documents to avail the scheme. Low participation prompted the extension.
Web Summary : यवतमाल ने ज्वार जैसी फसलों के लिए गारंटीकृत मूल्य खरीद पंजीकरण 15 मई तक बढ़ा दिया है। किसानों से योजना का लाभ उठाने के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ नामित केंद्रों पर पंजीकरण कराने का आग्रह किया गया है। कम भागीदारी के कारण विस्तार किया गया।