Guava Pruning : पेरू बाग छाटणी तंत्र हे फळबाग व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. पेरू फळबागेत (Guava Orchard) योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने छाटणी केल्यास फळधारणेचे प्रमाण आणि एकूण उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवता येते. (Guava Pruning Techniques)
यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतोच, शिवाय बागेचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते. (Guava Pruning Techniques)
पेरू छाटणी कधी करावी?
* पेरूच्या झाडांची छाटणीसाठी मे महिना सर्वात चांगला मानला जातो. यावेळी झाडाच्या जाड फांद्या सोडून इतर बारीक काड्या छाटल्या जातात.
* जर झाडांची वाढ जास्त झाली असेल, तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ‘पिंचिंग’ (Pinching) करून वाढणारा शेंडा हाताने काढावा.
छाटणीचे तंत्र (Guava Pruning Techniques) :
* फांद्यांचे पातळ करणे : झाडाच्या तळाशी काही फांद्या कापून टाकल्यास झाडात हवा खेळती राहते व फळधारणा सुधारते.
* पिंचिंग : वाढणाऱ्या फांद्यांच्या टोकाला हाताने तोडल्याने फांद्यांची अनियंत्रित वाढ थांबते.
* मागे जाणे : फांद्यांची लांबी कमी करणे म्हणजे मागे जाणे, ज्यामुळे झाड अधिक बहरते.
उत्पादनवाढीसाठी काय आहेत फायदे
* फळांचे आकार, रंग व चव सुधारते
* बहर एकसंध येतो
* रोगट व निर्जीव फांद्या निघाल्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
* मृग बहरासाठी आधारभूत पायरी तयार होते.
रोजगार मिळतोय
अंबड तालुक्यातील हस्तपोखरी परिसरात सध्या पेरू आणि सीताफळ बागांची छाटणी जोरात सुरू आहे. त्यामुळे येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
छाटणीचा खर्च किती?
* पेरू बागेची छाटणी करताना एका झाडाची छाटणी करण्यासाठी ७ - ८ रुपये प्रति झाड खर्च लागतो आहे.
* शेतकरी दररोज ५०-१०० झाडांपर्यंत छाटणी करतात.
* उष्णतेमुळे सकाळी लवकर काम सुरू होते, दुपारी विश्रांती घेतात.
फळधारणा वाढवण्यासाठी आणि पेरू उत्पादनात सातत्य राखण्यासाठी, योग्य वेळी छाटणी करणे आवश्यक आहे. हा छोटासा उपाय शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठी वाढ करू शकतो. पेरू छाटणीचे केल्यास (Guava Pruning Techniques) बहरात वाढ, उत्पादनात वाढ, आणि उत्पन्नात समाधानकारक मिळते.
शेतकरी काय सांगतात
आमच्या शेतात पेरूची सुमारे ३,५०० झाडे आहेत. सध्या छाटणी सुरू आहे. मजुरीचा खर्च वाढला असला तरी पुढील बहर चांगला यावा म्हणून योग्य छाटणी करणे आवश्यक आहे. - वर्षा वाघ, शेतकरी
सध्या रोजगार हमी योजना बंद असल्याने आम्ही पेरू बागांमध्ये छाटणी करत आहोत. दिवसाला ७०० ते ८०० रुपये मिळतात. - नितीन आव्हाड, मजूर