Lokmat Agro >शेतशिवार > Grape Farming Crisis : जालन्यात द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली; करपा रोगाने घड जिरले

Grape Farming Crisis : जालन्यात द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली; करपा रोगाने घड जिरले

latest news Grape Farming Crisis: Concerns of grape growers in Jalna increased; Clusters died due to scab disease | Grape Farming Crisis : जालन्यात द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली; करपा रोगाने घड जिरले

Grape Farming Crisis : जालन्यात द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली; करपा रोगाने घड जिरले

Grape Farming Crisis : जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने गळू लागली आहेत. याचा थेट परिणाम घडांवर होऊन द्राक्ष उत्पादन धोक्यात आले आहे. (Grape Farming Crisis)

Grape Farming Crisis : जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने गळू लागली आहेत. याचा थेट परिणाम घडांवर होऊन द्राक्ष उत्पादन धोक्यात आले आहे. (Grape Farming Crisis)

शेअर :

Join us
Join usNext

Grape Farming Crisis : जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने गळू लागली आहेत. याचा थेट परिणाम घडांवर होऊन द्राक्ष उत्पादन धोक्यात आले आहे.(Grape Farming Crisis) 

परिणामी, लाखो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. (Grape Farming Crisis)

सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने गळू लागली आहेत. याचा थेट परिणाम घडांवर होऊन द्राक्ष उत्पादन धोक्यात आले आहे. परिणामी, लाखो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.(Grape Farming Crisis)

मागील आठवडाभर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पानगळ प्रचंड प्रमाणात होत आहे. याचा थेट परिणाम द्राक्षाच्या घडांवर होऊन अनेक ठिकाणी घड जिरू लागले आहेत.(Grape Farming Crisis)

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

लाखो रुपये खर्च करून व अहोरात्र मेहनत करूनही हाती फारसे काही लागणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बागेवर केलेला खर्च निघेल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे.

द्राक्ष लागवडीचे क्षेत्र घटले

पूर्वी जालना तालुक्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र ३ हजार ते ४ हजार एकरांपर्यंत होते. मात्र, हवामान बदलामुळे व वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हे क्षेत्र आता १ हजार ५०० ते २ हजार एकरांवर आले आहे. शेतकऱ्यांच्या पदरी वर्षानुवर्षे निराशाच येत आहे.

करपा रोगाने बागा उद्ध्वस्त

सततच्या पावसामुळे पानांवर करपा रोग पसरत आहे.

पाने पिवळी पडून गळत आहेत.

पानगळ झाल्यामुळे घडांना पोषण मिळत नाही.

परिणामी घड कमकुवत होऊन गळत आहेत.

यामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांची व्यथा

यावर्षी द्राक्षावर केलेला खर्च निघेल की नाही, याची खात्री उरलेली नाही. करपा रोगामुळे पानगळ व घड जिरण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.-राम क्षीरसागर, शेतकरी

यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सततच्या पावसाने सर्व चित्रच बदलले आहे.-दत्तात्रय चव्हाण,द्राक्ष उत्पादक   

सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांच्या मते, हवामान बदलाचा परिणाम आता फक्त द्राक्षावरच नव्हे तर मोसंबीसारख्या इतर फळपिकांवरही दिसत आहे. त्यामुळे सरकार व प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन धोरणात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा सविस्तर : Grape Farming Crisis : गोड द्राक्षांची कडू कहाणी; कडवंचीची द्राक्ष शेती का झाली अर्ध्यावर? वाचा सविस्तर

Web Title: latest news Grape Farming Crisis: Concerns of grape growers in Jalna increased; Clusters died due to scab disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.