Join us

Government Schemes : युवकांसाठी सुवर्णसंधी! खादी मंडळाच्या योजनांनी गावातच मिळवा रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:17 IST

Government Schemes : तुमच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे? गावात उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे? मग सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या या योजना तुमच्यासाठीच आहेत. या योजनांतून विनातारण कर्ज, टूलकिट, प्रशिक्षण आणि लाखोंचे अनुदान मिळू शकते. कसे ते वाचा सविस्तर

Government Schemes : तुमच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे? गावात उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे? मग सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या या योजना तुमच्यासाठीच आहेत.या योजनांतून विनातारण कर्ज, टूलकिट, प्रशिक्षण आणि लाखोंचे अनुदान मिळू शकते. (Government Schemes)

ग्रामीण भागातील पारंपरिक व्यावसायिक, कारागीर आणि बेरोजगार युवकांना सक्षम बनवून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. (Government Schemes)

यामुळे ग्रामीण युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यास तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यास मोठा हातभार लागत आहे. (Government Schemes)

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (PMEGP)

ही योजना उत्पादन व सेवा उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जात आहे.

उत्पादन उद्योगासाठी अर्थसहाय्य : ५० लाख रुपयांपर्यंत

सेवा उद्योगासाठी अर्थसहाय्य : २० लाख रुपयांपर्यंत

पात्रता : किमान ८वी उत्तीर्ण, वय १८ वर्षांवरील

भांडवली सहभाग 

सामान्य गटासाठी – १०%

विशेष गटासाठी – ५%

दुबार कर्ज प्रकल्प : कार्यरत युनिटच्या विस्तारासाठी  सुमारे १ कोटी रुपयांपर्यंत बँक कर्ज व अनुदानाची सुविधा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP)

राज्यातील युवक-युवतींसाठी मोठा संधीचा मार्ग खुला

योजनेचे उद्दिष्ट

१ लाख लघुउद्योग स्थापन

१० लाख रोजगार निर्मिती

वयोगट : १८ ते ४५ वर्षे

कर्ज मर्यादा 

उत्पादन क्षेत्र – ५० लाख रुपये

सेवा क्षेत्र – २० लाख रुपये

अनुदान : १५% ते ३५% पर्यंत

मध केंद्र योजना

मध उत्पादनाला प्रोत्साहन देणारी विशेष योजना

५०% अनुदानावर साहित्य

प्रशिक्षण व हमी दराने खरेदीची व्यवस्था

मधपाळांसाठी उत्पन्न व व्यावसायिक संधी

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांसाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना

कौशल्य प्रशिक्षण

१५ हजार रुपये किमतीची टूलकिट

२ लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज

विविध इतर लाभ

शाश्वत ग्रामविकासाची दिशा

या योजनांमुळे ग्रामीण भागातील युवकांना स्वयंपूर्ण रोजगार प्राप्त होत असून मायभूमीतच उद्योग सुरू करण्यास प्रेरणा मिळते आहे. पारंपरिक उद्योगांना आधुनिकतेची जोड मिळाल्याने गावाच्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा 

जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय अथवा जिल्हा उद्योग केंद्र यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती घ्यावी.

हे ही वाचा सविस्तर : Bamboo Cultivation : अनुदान भरपूर, लागवड थोडी; बांबू योजनेला प्रतिसाद का नाही? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसरकारी योजनाकृषी योजनाशेतकरीशेतीकेंद्र सरकारग्रामीण विकास