Gas Cylinder Expiry : आपल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्र, निवारा. यामध्ये अन्न शिजवण्यासाठी आता गॅस सिलेंडरचा सर्रास उपयोग केला जातो. कारण गॅस संपल्यावर स्वयंपाकासाठी नव्या गॅस सिलेंडरची तजवीज करावीच लागते. असा हा गॅस सिलेंडर प्रत्येकाचा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. याच गॅस सिलेंडरची एखादी एक्सपायरी डेट असू शकते का? तर हो...
गॅस सिलेंडरचा वापर नित्याचा झाला आहे. गॅस संपला की दुसरा सिलेंडर जोडत असतो. पण त्याची एक्स्पायरी डेटही असते हे आपल्याला ठाऊकच नसते. तर गॅस सिलेंडरला देखील एक्स्पायरी डेट असते. तर ही एक्स्पायरी डेट कशी पाहायची, हे समजून घेऊयात....
सिलेंडर समजून घेऊया...
आपल्यासमोर गॅस सिलेंडर आहे, असं गृहीत धारा. या सिलेंडरच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगात सिलेंडरचे पूर्णतः वजन लिहलेले असते. जसे १६.२ किलो. त्याचबरोबर या अंकांच्या खालील बाजूस लाल रंगात सिलेंडरमध्ये असलेल्या गॅसचे वजन लिहलेले असते. जसे की १४. २ किलो.
एक्सपायरी डेट कुठे पाहायची?
आता एक्सपायरी डेट कुठे पाहायची? तर हेच वरील अंक तुम्ही पाहिले ना, याच ठिकाणी सिलेंडर पकडण्यासाठी तीन लोखंडी पट्ट्या आहेत. यापैकी एका पट्टीवर सिलेंडरची एक्सपायरी डेट लिहलेली असते. या लोखंडी पट्टीवर इंग्रजी अक्षर आणि अंक लिहिलेला असतो. हा एक प्रकारचा कोड असतो. यालाच त्या सिलिंडरची एक्स्पायरी डेट म्हणतात.
एक उदाहरण पाहुयात...
जर तुमच्या गॅस सिलिंडरवर B-२९ असे लिहिले असेल, तर याचा अर्थ हे सिलिंडर एप्रिल, मे, जून २०२९ मध्ये या सिलेंडरची वैधता संपणार आहे. आता यामध्ये A, B, C, D ही अक्षरे महिना दर्शवण्यासाठी वापरली जातात. यातील प्रत्येक कोडसाठी म्हणजे अक्षरासाठी तीन महिने गृहीत धरण्यात आले आहेत.
