Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Gahu Kadhani : गहू काढणीनंतर 'या' मशीनने स्वच्छ करा, चांगला भाव मिळेल, वाचा सविस्तर 

Gahu Kadhani : गहू काढणीनंतर 'या' मशीनने स्वच्छ करा, चांगला भाव मिळेल, वाचा सविस्तर 

Latest News Gahu Kadhani Clean wheat with machine after harvesting, get good price, read in detail | Gahu Kadhani : गहू काढणीनंतर 'या' मशीनने स्वच्छ करा, चांगला भाव मिळेल, वाचा सविस्तर 

Gahu Kadhani : गहू काढणीनंतर 'या' मशीनने स्वच्छ करा, चांगला भाव मिळेल, वाचा सविस्तर 

Gahu Kadhani : हार्वेस्टरने गहू काढल्यानंतर तो स्वच्छ करण्यात फिल्टर यंत्रणेचा (Wheat Filter) वापर केला, तर गहू अधिक स्वच्छ होत असतो.

Gahu Kadhani : हार्वेस्टरने गहू काढल्यानंतर तो स्वच्छ करण्यात फिल्टर यंत्रणेचा (Wheat Filter) वापर केला, तर गहू अधिक स्वच्छ होत असतो.

जळगाव : जिल्ह्यात यंदा गहू लागवडीचे (Gahu Lagvad) क्षेत्र वाढले होते. त्यात आतापर्यंत ८० टक्के गहू शेतातून काढून झाला आहे. जिल्ह्यात हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. मात्र, हार्वेस्टर मशीनद्वारे Wheat Harvesting) गहू काढल्यानंतरही गव्हात मोठ्या प्रमाणात, खडे, माती व काचोळ्यांचे प्रमाण असतेच. हार्वेस्टरने गहू काढल्यानंतर तो स्वच्छ करण्यात फिल्टर यंत्रणेचा (Wheat Filter) वापर केला तर यामुळे गहू अधिक स्वच्छ होत असतो.

गहू काढण्यासाठी १५०० रुपये, तर अर्ध्या बिघ्याला ८०० रुपये घेतले जातात. अर्ध्या तासातच गव्हाची काढणी (Gahu Kadhani) होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व कष्ट वाचत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या यंत्राच्या साहाय्याने गहू काढणीला प्राधान्य देत आहेत. मशिनमुळे कमी वेळात गव्हाची काढणी होत असल्याने मनुष्यबळही कमी लागत आहे. मात्र, या मशिनने गहू काढल्याने धान्यात कचन्याचे प्रमाण हे कायमच असते. या मशिनने काढलेल्या गव्हात काचोळ्यांचे प्रमाण अधिक असते.

फिल्टर करण्याचे प्रतिक्विंटल दर काय?
गहू फिल्टर करण्यासाठीचा दर एका पोत्यामागे १०० ते १२० रुपये एवढा आहे. मात्र, गहू या मशिनमुळे स्वच्छ होतो. त्यामुळे जर बाजारात असा गहू विक्रीला आणला तर दोन पैसे चांगला भाव मिळत असतो. अनेकदा नवीन गहू घेतल्यानंतर त्या गव्हात असलेल्या काचोळ्या च मातीच्या खड्यांमुळे गहू निवडावाच लागतो. मात्र, जर फिल्टर मशिनमधून गहू स्वच्छ केला असेल तर गहू निवडण्याचाही ताण वाचत असतो.

खडे, माती येण्याचीही शक्यता
हार्वेस्टरने काढलेल्या गव्हात काचोळ्यांसह मातीचे खडेही येतात. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी हा माल जेव्हा जातो, त्यामुळेही काही प्रमाणात मालाच्या दरावरही त्याचा परिणाम होत असतो. गहू फिल्टर करणाऱ्या यंत्रणेचा वापर केला, तर गहू काढणीनंतर गव्हात असणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९९ टक्के कमी होते. गहू चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो. गहू स्वच्छ झाल्यानंतर वेट दळायला घेऊन जाता येईल एवढा गहू या मशिनमुळे स्वच्छ होत असतो.

गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचा वापर केला तर अर्ध्या किंवा एक तासातच गहू काढला जातो. गहू काढल्यानंतर त्यात काचोळ्या, मातीचे खड़े हे असतातच, अशावेळी जर फिल्टर मशीनने गहू स्वच्छ करून घेतला तर गहू अधिक स्वच्छ होतो. त्यामुळे भावही चांगला मिळतो.
- पंकज जनार्दन चौधरी, गहू उत्पादक शेतकरी

Web Title: Latest News Gahu Kadhani Clean wheat with machine after harvesting, get good price, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.