Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Fuel Crisis Farming : डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी संकटात; उन्हाळी मशागत कशी करणार?

Fuel Crisis Farming : डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी संकटात; उन्हाळी मशागत कशी करणार?

latest news Fuel Crisis Farming: Farmers in crisis due to rumors of diesel shortage; How will they do summer farming? | Fuel Crisis Farming : डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी संकटात; उन्हाळी मशागत कशी करणार?

Fuel Crisis Farming : डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी संकटात; उन्हाळी मशागत कशी करणार?

Fuel Crisis Farming : इंधन टंचाईच्या अफवेमुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसत आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडत असून उन्हाळी मशागतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचे मोठे संकट उभे ठाकले आहे.(Fuel Crisis Farming)

Fuel Crisis Farming : इंधन टंचाईच्या अफवेमुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसत आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडत असून उन्हाळी मशागतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचे मोठे संकट उभे ठाकले आहे.(Fuel Crisis Farming)

Fuel Crisis Farming : राज्यात सध्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही अडचणीत सापडले आहेत.(Fuel Crisis Farming)

विशेषतः उन्हाळी हंगामात शेतशिवारात वखरणी (उन्हाळवाई) करण्यासाठी ट्रॅक्टरवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.(Fuel Crisis Farming)

डिझेल मिळण्यात अडचणी येत असल्याने मशागतीची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अफवेमुळे वाढली धावपळ

गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेल तुटवड्याची अफवा वेगाने पसरली. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. 

अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असून, पंपांवरून मर्यादित इंधन दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल मिळणे कठीण झाले आहे.

उन्हाळी मशागतीवर परिणाम

गुढीपाडव्याच्या सुमारास उन्हाळी मशागतीला सुरुवात होते. या काळात शेतातील जमीन खोलवर नांगरून उन्हात तापवली जाते, ज्यामुळे कीड-रोग नियंत्रणास मदत होते. मात्र, डिझेलअभावी ट्रॅक्टर चालवणे कठीण झाल्याने ही प्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

ट्रॅक्टरचालकांकडून उधारी बंद

डिझेल मिळवण्यासाठी ट्रॅक्टर चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. रांगेत उभे राहूनही पुरेसे इंधन मिळत नसल्याने त्यांनी उधारीवर मशागत करण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी, ज्यांच्याकडे तत्काळ पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

मशागतीचे दर वाढण्याची शक्यता

इंधन टंचाई कायम राहिल्यास मशागतीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रॅक्टरचालकांना अधिक वेळ आणि खर्च करावा लागत असल्याने ते दर वाढवू शकतात. याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

शेती उत्पादनावर परिणामाची भीती

वेळेत मशागत न झाल्यास जमिनीची उष्णता प्रक्रिया (soil heating) व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पुढील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून, पुढील हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने स्पष्टता देण्याची गरज

सध्या इंधन तुटवड्याबाबत स्पष्ट अधिकृत माहिती नसल्याने अफवा अधिक वेगाने पसरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने स्पष्टता देऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.

इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट परिणाम शेती व्यवस्थेवर होत आहे. उन्हाळी मशागतीसारखे महत्त्वाचे काम अडचणीत आले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढला आहे. योग्य वेळी उपाययोजना न झाल्यास याचे परिणाम पुढील हंगामावरही दिसू शकतात.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story :'सोनेरी' शेतीचा फॉर्म्युला; कमी खर्चात तरुणाची मोठी कमाई वाचा सविस्तर

अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!

Web Title: latest news Fuel Crisis Farming: Farmers in crisis due to rumors of diesel shortage; How will they do summer farming?