Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Fodder Shortage : चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर

Fodder Shortage : चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर

latest news Fodder Shortage: No fodder… but ‘this’ idea is great; Read in detail about the new fund for livestock farmers | Fodder Shortage : चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर

Fodder Shortage : चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर

Fodder Shortage : चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या पशुपालकांनी एक नवा मार्ग शोधला आहे. तूर पिकांच्या सोंगणीच्या बदल्यात मजुरी न घेता कुटार मिळवण्याची पद्धत सध्या अनेक गावांमध्ये रूढ होत असून, या 'नव्या फंड्या'मुळे पशुपालकांना चाऱ्याचा आधार मिळतोय, तर शेतकऱ्यांचाही खर्च वाचत आहे. (Fodder Shortage)

Fodder Shortage : चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या पशुपालकांनी एक नवा मार्ग शोधला आहे. तूर पिकांच्या सोंगणीच्या बदल्यात मजुरी न घेता कुटार मिळवण्याची पद्धत सध्या अनेक गावांमध्ये रूढ होत असून, या 'नव्या फंड्या'मुळे पशुपालकांना चाऱ्याचा आधार मिळतोय, तर शेतकऱ्यांचाही खर्च वाचत आहे. (Fodder Shortage)

Fodder Shortage : यंदाच्या खरीप हंगामात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे तसेच पावसाच्या अनियमिततेमुळे मूग, उडीद, ज्वारीसारखी अनेक चारा देणारी पिके मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. (Fodder Shortage)

परिणामी ग्रामीण भागात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पशुपालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे अर्थकारण अडचणीत आले आहे. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी पशुपालकांनी एक आयडिया शोधून काढली असून, ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.(Fodder Shortage)

सध्या सर्वत्र तूर पिकांची सोंगणी सुरू आहे. याच संधीचा फायदा घेत पशुपालकांनी शेतकऱ्यांसमोर 'सोंगणी करून घ्या आणि कुटार द्या' असा प्रस्ताव ठेवला आहे. (Fodder Shortage)

मजुरीऐवजी तूर पिकाचे कुटार मिळाल्याने पशुपालकांना जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध होत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनाही मजुरीवर होणारा खर्च वाचत असल्याने या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

विशेषतः स्वतःची शेती नसलेल्या पशुपालकांसाठी ही पद्धत वरदान ठरत आहे. 

चाऱ्यासाठी दूरवर भटकंती करण्याची गरज कमी झाली असून, जनावरांचे संगोपन करणे तुलनेने सुलभ झाले आहे. अनेक गावांमध्ये शेतकरी व पशुपालक परस्पर विश्वासावर ही व्यवस्था राबवत असल्याचे दिसून येत आहे.

तूर कुटारामुळे जनावरांना काही प्रमाणात पोषण मिळत असून, चारा टंचाईच्या काळात हा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. 

सद्यस्थितीत ही तात्पुरती व्यवस्था असली, तरी ग्रामीण भागात निर्माण झालेल्या संकटात शेतकरी आणि पशुपालकांनी दाखवलेला परस्पर सहकार्याचा हा आदर्श कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.

चाऱ्याची परिस्थिती आगामी काळातही तशीच राहिल्यास, पशुपालकांचा हा नवा फंडा आणखी व्यापक प्रमाणात स्वीकारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा सविस्तर : Hydroponic Fodder : जनावरांना नवा आहार; आरोग्याला नवा आधार वाचा सविस्तर

Web Title : चारे की कमी: 'चारे के लिए कटाई' का अभिनव विचार लोकप्रिय

Web Summary : फसल क्षति के कारण चारे की कमी का सामना करते हुए, महाराष्ट्र के पशुपालक फसल अवशेष (कुटार) के बदले तुअर की फसल काटने की पेशकश कर रहे हैं। यह पारस्परिक रूप से लाभकारी प्रणाली जानवरों के लिए चारा प्रदान करती है और किसानों के लिए श्रम लागत को कम करती है, खासकर भूमिहीन पशुधन मालिकों के लिए एक वरदान साबित होती है।

Web Title : Fodder Shortage: Innovative 'Harvest for Fodder' Idea Gains Traction

Web Summary : Facing fodder scarcity due to crop damage, Maharashtra's livestock farmers are offering to harvest tur crops in exchange for the crop residue (kutar). This mutually beneficial system provides fodder for animals and reduces labor costs for farmers, proving a boon, especially for landless livestock owners.