Join us

Farmer Success Story : युट्यूबवरून शिकलं, शेतात फुलवलं; अंगठेबहाद्दर विठ्ठलरावांची सफरचंद यशकथा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:18 IST

Farmer Success Story : परंपरागत शेतीतून कधीच स्थिर उत्पन्न मिळालं नाही... पण अडचणीतून मार्ग शोधणाऱ्या अंगठेबहाद्दर विठ्ठल गर्जेंनी सोशल मीडियाचा आधार घेत नवा प्रयोग केला आणि थेट हिमाचलच्या सफरचंदाला मराठवाड्यात रुजवलं! फळांची पहिलीच बहरलेली बाग पाहून आता साऱ्या गावात चर्चा आहे 'त्या सफरचंदवाल्या विठ्ठलची'.

नितीन कांबळे

परंपरागत शेतीतून कधीच स्थिर उत्पन्न मिळालं नाही... पण अडचणीतून मार्ग शोधणाऱ्या अंगठेबहाद्दर विठ्ठल गर्जेंनी सोशल मीडियाचा (Social Media) आधार घेत नवा प्रयोग केला आणि थेट हिमाचलच्या सफरचंदाला मराठवाड्यात रुजवलं! फळांची पहिलीच बहरलेली बाग पाहून आता साऱ्या गावात चर्चा आहे 'त्या सफरचंदवाल्या विठ्ठलची'. (Farmer Success Story) 

शिक्षण नसताना खाजगी वाहनावर चालक म्हणून काम केल्यानंतर गावी येताच सोशल मीडियाचा (Social Media) आधार घेऊन शेतीविषयक माहिती घेत आधुनिक तंत्रज्ञान अवगत करत अंगठेबहाद्दर शेतकऱ्यानी २० गुठ्ठे क्षेत्रात सफरचंद बाग फुलवली असून त्याला फळे लगडली आहेत. (Farmer Success Story) 

रोप, ठिंबकसह मजुरी असा पन्नास हजार खर्च झाला असून यातून भाव मिळाल्यास दीड लाखाच्या घरात उत्पन्न मिळेल, असे विठ्ठलरावांनी सांगितले. (Farmer Success Story) 

अंगठेबहाद्दर प्रगतशील शेतकरी  विठ्ठल, रुक्मिणी यांचे स्वप्न साकार

आष्टी तालुक्यातील खिळद येथील विठ्ठल शंकर गर्जे याची परिस्थिती हलाखिची घरी शेतीबाडी पण पारंपारिक पिकात पडतळ खात नसल्याने लेकराच्या शिक्षणाचा देखील खर्च भागत नव्हता. 

मग त्यांनी काही वर्ष खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत मुलाचं शिक्षण केलं दोन्ही मुले सध्या इंजिनिअर आहेत. मग गावी आल्यानंतर शेतात काय करायच असा विचार करत असताना युट्यूब वर शेतीविषयक माहिती घेतली.

तीन वर्षापुर्वी हिमाचल प्रदेश येथून सफरचंदाची रोपे आणून दहा बाय दहा अशी लागवड करून ठिंबकच्या माध्यमातून पाण्याची सोय केली.

फवारणी, खत, असा जवळपास ५० हजार रूपये खर्च झाला. आता या झाडाला फळ लागले असून काही दिवसात बाजारपेठेत दाखल होईल. यातून जर चांगला भाव मिळाला तर दीड लाख रूपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे गर्जे यांनी सांगितले. तर यासाठी पत्नी रुक्मिणी हिची देखील साथ लाभत आहे.

पारंपारिक शेतीत पडतळ बसत नसल्याने आधुनिक शेतीची कास धरून शेतात लिंबोणी ३० गुठ्ठे, मोहगणी ४० गुठ्ठे, ॲपल बोरं २० गुठ्ठे ही फळबाग शेती करत असताना सोशल मीडियावर बघून सफरचंद शेती केली. पण ती यशस्वी झाल्याचा आनंद आहे.

भविष्यात आणखी क्षेत्र वाढवणार असून तरूणांनी देखील विविध प्रकारची आधुनिक शेती करावी, असा सल्ला शेतकरी विठ्ठल गर्जे यांनी दिला आहे. तालुक्यातील केळसांगवी, सोलापूरवाडी या दोन गावात दीड हेक्टर क्षेत्रावर सफरचंद शेती असून  नाविन्यपूर्ण पीक आहे. थंड हवामानात येणारे पीक आहे. परंतु काही जाती समशीतोष्ण भागामध्ये येणाऱ्या आहेत. त्यामुळे हे फळे मराठवाड्यातील मातीत रुजलं.

शिक्षण नसलं तरी शिकण्याची तयारी असेल, तर यश नक्की मिळतं, अशी खरीखुरी जिद्द असणारी ही जोडी आज मराठवाड्यातील नवशिक्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरते आहे.

सफरचंद हे नाविन्यपूर्ण पीक आहे. थंड हवामानात येणारे पीक आहे. परंतु काही जाती समशीतोष्ण भागामध्ये येणाऱ्या आहेत. नक्कीच पुढील काही दिवसात शेतकरी या पिकाकडे वळतील. कृषी विभागाकडून मार्गदर्शन देखील केले जाते.- गोरख तरटे तालुका कृषी अधिकारी आष्टी

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : नैसर्गिक शेतीतून कमावले लाखो; खुशाल कल्याणकर यांची प्रेरणादायी कथा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमराठवाडाफळेपीक