वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे.(Farmer Protest)
पॉवर ग्रीड कंपनीकडून १२० पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या दोन दिवसांत रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Farmer Protest)
८१९ शेतकरी पात्र, मोबदला मात्र रखडला
जिल्ह्यातील ८१९ शेतकऱ्यांच्या शेतातून १२०० केव्ही वर्धा–छ. संभाजीनगर वीज लाईन टाकण्यात आली होती. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
कंपनीकडून मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र २०२१ पासून अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते.
'टॉवर चढो' आंदोलनाचा परिणाम
मोबदला न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या नेतृत्वाखाली २७ एप्रिल रोजी टॉवर चढो आंदोलन छेडले.
या आंदोलनाची कंपनीने तात्काळ दखल घेतली
२० शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करण्यात आली
आता १२० शेतकऱ्यांना मिळणार मोबदला
१२० पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम
येत्या दोन दिवसांत खात्यात पैसे जमा होणार
प्रक्रिया वेगाने सुरू
यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विलंबाचे कारण काय?
पॉवर ग्रीड कंपनीच्या माहितीनुसार काही शेतजमिनी सामायिक (joint ownership) असल्याने वाद निर्माण झाले.
कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया वेळखाऊ
त्यामुळे मोबदला देण्यात विलंब झाला
जिल्ह्यातील ८१९ शेतकरी मोबदल्यास पात्र आहेत. काही ठिकाणी जमीन वादांमुळे विलंब झाला. आता प्रक्रिया पूर्ण होत असून, खात्यात रक्कम जमा केली जात आहे.- ज्ञानेश्वर बेरिया, प्रबंधक, पॉवर ग्रीड
२०२१ पासून मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे आंदोलन करावे लागले. आता त्याची दखल घेऊन पैसे जमा होऊ लागले आहेत.- रघुनाथ खुपसे, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना
शेतकऱ्यांना दिलासा, पण पूर्ण समाधान नाही
आंदोलनानंतर मोबदला मिळण्यास सुरुवात झाली असली तरी सर्व ८१९ शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळणे बाकी आहे. उर्वरित प्रकरणे निकाली काढण्याची अपेक्षा आहे.
'टॉवर चढो' आंदोलनानंतर प्रशासन आणि कंपनीने घेतलेली दखल ही शेतकऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल ठरली आहे. मात्र, उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेत मोबदला मिळणे गरजेचे असून, या प्रक्रियेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Farmers in Washim will receive compensation from Power Grid for damages caused by high-voltage power lines after protests. 120 eligible farmers will have funds deposited soon. The delay was due to land ownership disputes. Agitation prompted action.
Web Summary : वाशिम के किसानों को उच्च-वोल्टेज बिजली लाइनों से हुए नुकसान के लिए पावर ग्रिड से मुआवजा मिलेगा। विरोध के बाद 120 पात्र किसानों के खातों में जल्द ही धनराशि जमा की जाएगी। भूमि स्वामित्व विवादों के कारण देरी हुई। आंदोलन से कार्रवाई हुई।