Join us

Falbaga Yojana: फळबाग योजनेचा गोडवा; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ३५० कोटी! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:28 IST

Falbaga Yojana : राज्य शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत (Bhau Saheb Fundkar Falbaga Yojana) अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ७०३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करून ६९३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ३५० कोटींचे अनुदान जमा झाले असून आंबा, संत्रा, केळी, पपई यांसारख्या फळबाग लागवडींना याचा थेट फायदा होत आहे. (Falbaga Yojana)

अकोला : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत (Bhau Saheb Fundkar Falbaga Yojana)  शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Falbaga Yojana)

जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ७०२.८७ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली असून, यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ३५० कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा करण्यात आले आहे.(Falbaga Yojana)

आंबा, संत्रा, केळी, पपईला प्राधान्य

या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा, संत्रा, केळी, पपई यासारख्या नगदी फळबाग लागवडींना विशेष प्राधान्य दिले. पारंपरिक पिकांसोबत फळबाग लागवड करून दीर्घकालीन उत्पन्न मिळावे आणि शेतीत स्थिरता यावी, हा उद्देश लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

तालुकानिहाय फळबाग लागवड क्षेत्र

अकोट – १८३ हेक्टर

पातूर – १८८ हेक्टर

तेल्हारा – १२१ हेक्टर

बार्शिटाकळी – ७१ हेक्टर

बाळापूर – ७६ हेक्टर

मूर्तिजापूर – २४ हेक्टर

अकोला – ३० हेक्टर

जिल्ह्यात एकूण ६९३ शेतकरी लाभार्थी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीशी जोडले गेले.

कृषी विभागाची माहिती

मागील आर्थिक वर्षात मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात ७०३ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. फळबाग लागवडीच्या अनुदानापोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ३५० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा मार्ग

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पादनक्षम शेतीसाठी हातभार लावत आहे. पारंपरिक पिकांच्या तोट्याला पर्याय म्हणून फळबाग लागवड केल्यास शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरत असल्याचे कृषी विभागाचे मत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : ऐन हंगामात सोयाबीनला फटका; दर घसरण्यामागची प्रमुख कारणे काय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेअकोलाकृषी योजना