Join us

'या' योजनेंतर्गत ड्रॅगन फ्रुट, ॲव्होकाडोसह लावा 20 प्रकारची फळपिके, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:05 IST

Falbag Lagvad Yojana : शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची / वृक्षांची / फुलपिकांची /मसाला पिकांची लागवड करता येते. 

Falbag Lagvad Yojana :  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत Rojgar Hami Yojana) लाभार्थीस सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची / वृक्षांची / फुलपिकांची /मसाला पिकांची लागवड करता येते. 

योजनेची अंमलबजावणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्फत केली जाते. लागवड कालावधी माहे जून ते मार्च (ज्या लाभार्थ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, त्यांना मार्चपर्यंत लागवड करता येईल.)

फळपीके : आंबा, काजू, चिकू, पेरु, डांळिब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ (बाणवली / टी.डी), बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, द्राक्ष, केळी (३ वर्षे), सुपारी, साग, गिरीपुष्प, कडूलिंब, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रेोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पती.

विदेशी पिके : ड्रॅगनफ्रुट नफ्रूट, ॲव्होकाडोफुलपिके : गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफामसाला पिके : लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी.

समाविष्ट जिल्हे राज्यातील ३४ जिल्हे

लाभार्थी पात्रतेचे निकष :लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कूळाचे नाव असेल तर योजना कूळाच्या संमतीने राबविण्यात यावी.लाभार्थी जॉबकार्ड धारक असावा.

योजनेसाठी जॉबकार्ड धारक पुढील अ ते ज प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून लाभ घेण्यास पात्र राहील.अ) अनुसूचित जाती ब) अनुसूचित जमाती क) भटक्या जमाती ड) निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती) इ) दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे फ) स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे ग) दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी ई) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी ज) अनुसूचित जमातीचे व इतर पांरपरिक वनवासी (वन हक्के मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील पात्र व्यक्ती योजनेतील लाभार्थीना लागवड केलेल्या फळझाडे/ वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायत पिकांचे ९०% आणि कोरडवाहू पिकांचे ७५% झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहिल.लाभार्थ्यांना ०.०५ हेक्टर ते २.०० हेक्टर क्षेत्राचे मयदित फळझाड लागवड करता येते.

टॅग्स :कृषी योजनाशेतीफळेपीक व्यवस्थापन