Fake Cotton Sowing Scam : वसमत तालुक्यातील शिरडशहापूर व मार्डी परिसरातील सुखमणी कॉटन जिनिंग आणि सीसीआय खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात बोगस कापूस पिक दाखवून शासनाची व शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.(Fake Cotton Sowing Scam)
सातबारा उतारे फेरफार करून कापसाचा पेरा नसतानाही पिक दाखवले जात असून, व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.(Fake Cotton Sowing Scam)
सातबाऱ्यात फेरफार – नुसत्या कागदावर कापूस!
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खरेदी केंद्रांवर प्रत्यक्षात कापूस झालेलाच नसलेल्या जमिनींचे बोगस सातबारा तयार केले जातात.
त्या जमिनी मालकांच्या नावावर व्यापारी हजारो क्विंटल कापूस विक्री करतात.
शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्यांचीच विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने खऱ्या शेतकऱ्यांचा नंबरच लागत नाही.
यामुळे शासनाच्या हमीभावावर कापूस विकायचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना सतत दारातच अडवले जाते, तर व्यापाऱ्यांचे मालाचे ट्रक थेट आत घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
व्यापारी, बाजार समिती आणि अधिकाऱ्यांचे संगनमत
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सीसीआय खरेदी केंद्र, बाजार समितीचे कर्मचारी व व्यापारी यांच्यात थेट संगनमत आहे.
बनावट उतारे तयार करून शासनाला आर्थिक चुना, आणि शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित ठेवण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे.
विचारणा केली तर 'टाळाटाळ'
या प्रकरणावर प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी अनेक प्रयत्न झाले; मात्र, बाजार समितीकडून कोणताही प्रतिसाद नाही, फोनवर “साहेब नाहीत… नंतर फोन करा” असा प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी म्हणतात की, तक्रारी देऊनही प्रशासकीय यंत्रणा मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. गैरव्यवहार उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित विभाग उत्तर देण्यास टाळाटाळ करतो आहे.
हमीभावापासून वंचित होणारे खरे शेतकरी
बोगस पिकांमुळे प्रत्यक्ष शेतात कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर लांब प्रतिक्षा,
गाडीचा नंबरच लागत नाही,
खाजगी व्यापाऱ्याकडे कमी दरात विक्री करावी लागते.
शेतकरी सांगतात, व्यापारी सरकारी दरात आपला माल विकतात, आणि आम्ही बाहेरच थांबतो!
चौकशीची तीव्र मागणी
आजवरची सर्व खरेदी तपासावी!
संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन खालील मागण्या केल्या आहेत—
आजवर ज्या-ज्या ठिकाणी कापसाची खरेदी झाली, त्याची संपूर्ण चौकशी करावी.
बोगस पेरा दाखवणाऱ्या व्यापारी, बाजार समिती कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी.
सीसीआय केंद्रावर फक्त खऱ्या शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
चालू असलेल्या काळ्या कारभाराला त्वरित आळा घालावा.
कारवाई झाली नाही तर आंदोलन
या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ, अशी भावना बळावत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Pest Control : हरभऱ्यावर घाटे अळीचा हल्ला; जाणून घ्या उपाययोजना
