Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोकरा प्रकल्पातील बिजोत्पादन घटकाच्या अर्जासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:45 IST

Agriculture News : अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन, अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. 

Agriculture News :    बिजोत्पादक शेतकऱ्यांना रबी हंगामातील हरभरा, गहू, रबी ज्वारी, करडई, मोहरी, जवस या पिकांसाठी डीबीटी (DBT) पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ होती. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन, अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) बिजोत्पादन घटकामध्ये हवामान अनुकूल वाणांचे बियाणे निर्मिती, प्रक्रिया, आणि साठवणुकीसाठी अर्थसाह्य मिळते. या अंतर्गत बियाणे प्रक्रिया उपकरणे, बियाणे सुकवणी यार्ड आणि साठवण गोदामांचा समावेश होतो, ज्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुमारे ७५% पर्यंत अनुदान दिले जाते

बीजोत्पादन (Seed Production) घटकासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारच्या 'महाडीबीटी' (MahaDBT) पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने केली जाते. या योजनेच्या अर्ज करण्यात मुदतीत वाढ करण्यात येऊन आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ​तरी ज्या बिजोत्पादक शेतकऱ्यांना अर्ज करणे शक्य झाले नाही, त्यांना पोकरा प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pokra Project Seed Production Application Deadline Extended: Apply by This Date

Web Summary : Deadline extended to January 31, 2026, for Pokra project seed production applications due to technical issues. Farmers can get up to 75% subsidy for seed processing equipment, drying yards, and storage godowns under the scheme. Apply via MahaDBT portal.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनशेतकरीकृषी योजना