गडचिरोली : गत तीन महिन्यांपासून रानटी हत्तींचा संचार पोर्ला वन परिक्षेत्रात आहे. हत्तींच्या कळपाने (Elephant Herd) क्वचितच या वन क्षेत्रातून अल्प कालावधीसाठी काढता पाय घेतला होता. तीन महिन्यांत हत्तींनी केलेल्या पीक नुकसानीपोटी वन विभागाने १८ लाख ३२ हजार ७८९ रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहे.
वहसा वन विभागांतर्गत पोर्ला (Forest Department) वन परिक्षेत्रात हत्तींच्या कळपाचा संचार आहे. रानटी हत्तींसाठी या वन परिक्षेत्रातील वातावरण मानवले की अशी दिली नुकसान भरपाई काय, कळपाने एकदोनवेळा चातगाव, पोटेगाव, आरमोरी व गडचिरोली वन परिक्षेत्रात प्रवेश केला. मात्र, पुन्हापोर्ला वन परिक्षेत्रातच हत्ती परतले.
सध्या पोर्ला व आरमोरी वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात हत्तीचा कळप वावरत आहे. वहसा वन विभागाचे उपवनसंरक्षक वरुण बी यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तींच्या कळपातर हुल्ला टीमकडून देखरेख ठेवली जात असून, वन परिक्षेत्रातील स्थानिक कर्मचारीसुद्धा देखरेख ठेवत आहेत, असे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी दिली नुकसान भरपाई
पोर्ला वन परिक्षेत्रात जानेवारी महिन्यात ५३ प्रकरणांपैकी ३६ मंजूर झाले. नुकसानीपोटी ३ लाख १० हजार४२५ रुपयांची भरपाई देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात १२७ प्रकरणांपैकी १३७ प्रकरणे मंजूर होऊन ११ लाख ६६ हजार २७१ रुपयांची भरपाई दिली. मार्च महिन्यांत १७१ प्रकरणांपैकी १७ प्रकरणे मंजूर होऊन ३ लाख ५६ हजार ९३ रुपयांची भरपाई दिली. एकूण १८ लाख ३२ हजार ७८९ रुपयांची भरपाई वनविभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
'बीरानटी हत्तींनी पिकांचे नुकसान केल्यास वनरक्षकांना माहिती द्यावी. नुकसानीचे पंचनामे केले जातील. काही दिवसांतच भरपाईसुद्धा दिली जाते. हत्ती हे आक्रमक असल्याने शेतकऱ्यांनी हत्तींच्या जवळ जाऊ नये, त्यांना डिवचू नये.
- संजय मेहेर, प्रभारी बन परिक्षेम अधिकारी, पोर्ला