E-Pik Pahani : खरीप हंगाम संपत आला असताना तालुक्यातील ई-पीक पाहणी मात्र अद्याप मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे. महसूल विभागाने निवडलेल्या १६३ सहायकांकडून ई-पीक पाहणी सुरू असली तरी, सॉफ्टवेअरमधील गंभीर तांत्रिक बिघाडामुळे हे काम ठप्प झाले आहे. (E-Pik Pahani)
अनेक सहायकांच्या लॉगिन आयडीवर दुसऱ्याच गावांची नावे दिसणे, शेतांची लोकेशन चुकीची दाखवणे यामुळे पाहणी अडकली असून अधिकारी आणि सहायकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.(E-Pik Pahani)
लोकेशनच चुकतंय!
सहायकांनी दिलेल्या आयडीने ई-पीक पाहणी अॅप उघडताच
पूर्णपणे वेगळ्या गावांची नावे दिसतात
प्रत्यक्ष शेताचे लोकेशन मॅपमध्ये दिसत नाही
चुकीच्या लोकेशनची पॉइंटिंग समुद्रात किंवा इतर जिल्ह्यांत दिसणे
यामुळे पाहणीचे काम प्रचंड विलंबित झाले आहे.
यापूर्वी यवतमाळमधील शेताचे लोकेशन थेट अरबी समुद्रात दिसल्याची घटना घडली होती.तशाच समस्या आता बार्शीटाकळी तालुक्यातही समोर येत आहेत.
५५% शेतांची पीक पाहणी अजूनही बाकी
खरीप हंगामात कपाशी आणि तुरी वगळता जवळपास सर्व पिकांची काढणी झाली आहे.
पण तरीही ५% शेतांची ई-पीक पाहणी अपूर्ण
शेतकरी आता रब्बी पेरणीला लागले
खरीप पाहणी पूर्ण होणार की नाही याबाबत संभ्रम
शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
१६३ सहायकांची नियुक्ती पण प्रयत्न व्यर्थ ठरतातय
महसूल विभागाने १६३ सहायकांना जबाबदारी दिली होती. यात महसूल सेवक, ग्राम रोजगार सेवक, आशा वर्कर, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. सर्वांना अॅप लॉगिन देण्यात आले असले तरी सिस्टमच साथ देत नाही, त्यामुळे पाहणी थांबलेली आहे.
शेतकरी मात्र संभ्रमात
खरिप पाहणी पूर्ण न झाल्यास भविष्यकालीन योजना, विमा, आर्थिक अंदाजपत्रक, नुकसान भरपाई आदींवर परिणाम
रब्बी पेरणी सुरू असली तरी खरीप पाहणी अडकलेली
सॉफ्टवेअर त्रुटी दूर होईपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम
बार्शीटाकळीतील ही परिस्थिती राज्यातील ई-पीक पाहणी प्रणालीतील तांत्रिक त्रुटींचे गांभीर्य दाखवते. अॅपमध्ये वेळेत सुधारणा न झाल्यास रब्बी हंगामावरही त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.
सहायकांना तांत्रिक अडचणीमुळे अडथळे येत आहेत. ही माहिती आम्ही वरिष्ठांकडे पाठवली आहे. सुधारणा झाल्यास उर्वरित शेतांची पाहणी सुरळीत होईल.- प्रसाद रानडे, जिल्हा समन्वयक, ई-पीक पाहणी (NIC), अकोला
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : सीसीआय खरेदीला वेग; राज्यात कापसाची मोठी आवक वाचा सविस्तर
