Lokmat Agro >शेतशिवार > Crop Pattern Change : यंदा बाजरीची लागवड 'इतके' टक्केच; सूर्यफूल पीक नामशेष वाचा सविस्तर

Crop Pattern Change : यंदा बाजरीची लागवड 'इतके' टक्केच; सूर्यफूल पीक नामशेष वाचा सविस्तर

latest news Crop Pattern Change: Millet cultivation this year is 'so' percent; Sunflower crop is extinct Read in detail | Crop Pattern Change : यंदा बाजरीची लागवड 'इतके' टक्केच; सूर्यफूल पीक नामशेष वाचा सविस्तर

Crop Pattern Change : यंदा बाजरीची लागवड 'इतके' टक्केच; सूर्यफूल पीक नामशेष वाचा सविस्तर

Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात पारंपरिक पिकांवर संकट कोसळले आहे. बाजरीची लागवड केवळ ८ टक्के इतकीच राहिली असून, सूर्यफूल पिकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. कमी बाजारभाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी या पिकांपासून दूर जात आहेत. (Crop Pattern Change)

Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात पारंपरिक पिकांवर संकट कोसळले आहे. बाजरीची लागवड केवळ ८ टक्के इतकीच राहिली असून, सूर्यफूल पिकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. कमी बाजारभाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी या पिकांपासून दूर जात आहेत. (Crop Pattern Change)

शेअर :

Join us
Join usNext

Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात पारंपरिक पिकांवर संकट कोसळले आहे. बाजरीची लागवड केवळ ८ टक्के इतकीच राहिली असून, सूर्यफूल पिकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. (Crop Pattern Change)

कमी बाजारभाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी या पिकांपासून दूर जात आहेत.(Crop Pattern Change)

बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामात पारंपरिक पिकांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. बाजरीची लागवड केवळ ८.६ टक्क्यांवर थांबली असून, सूर्यफुलाचे पीक यंदा नामशेष झाले आहे. (Crop Pattern Change)

शेतकरी कमी भाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे या पिकांपासून दूर जात असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.(Crop Pattern Change)

बाजरी लागवडीला शेतकऱ्यांचा नकार

सरासरी क्षेत्र : १५७.३५ हेक्टर

प्रत्यक्ष लागवड : १३ हेक्टर

म्हणजेच फक्त ८.६ टक्के लागवड झाली आहे.

शेतकरी नफ्याऐवजी तोटा सहन करत असल्याने त्यांनी कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळण्यास प्राधान्य दिले आहे.

सूर्यफूल पेरणीच नाही

सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र २.३६ हेक्टर असले तरी यंदा शून्य पेरणी झाली.

कमी मागणी

बाजारात अत्यल्प भाव

उत्पन्नाचा अस्थिर अंदाज

या सर्व कारणांमुळे शेतकरी सूर्यफुलापासून पूर्णपणे दूर गेले आहेत.

बाजरी आणि सूर्यफुलाला भावच नाही. छोटे शेतकरी हे पीक घेऊ शकत नाहीत. शासनाकडून सल्ला आणि आर्थिक मदत हवी, अन्यथा पारंपरिक पिकांचा नायनाट होईल.- नरेश वानखडे, शेतकरी

उत्पादन आणि बाजारात तुटवडा

बाजरीचे क्षेत्र घटल्यामुळे उत्पादनातही मोठी कपात अपेक्षित आहे. स्थानिक बाजारपेठेत बाजरीच्या उपलब्धतेवर ताण येण्याची शक्यता आहे. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान हा देखील लागवड न करण्याचा महत्त्वाचा घटक ठरला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Crop Pattern Change : पिक पॅटर्नमध्ये बदल: ज्वारी मागे, मक्याची झेप दुप्पट वाचा सविस्तर

अधिक वाचा :  Crop Pattern Change : कापूस मागे, सोयाबीन आघाडीवर; शेतकऱ्यांची बदलती पिकनिवड वाचा सविस्तर

Web Title: latest news Crop Pattern Change: Millet cultivation this year is 'so' percent; Sunflower crop is extinct Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.