Crop Pattern Change : बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामात यंदा मक्याची लागवड तब्बल सरासरीच्या दुपटीपर्यंत वाढली, तर पारंपरिक ज्वारीचे क्षेत्र ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचले आहे.(Crop Pattern Change)
पिकांच्या आकडेवारीत दिसणारा हा तफावत शेतकऱ्यांच्या पीक निवडीत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलाचा स्पष्ट पुरावा आहे.(Crop Pattern Change)
यंदा खरीप हंगामात मका पिकाची लागवड तब्बल सरासरीच्या दुप्पट झाली आहे, तर ज्वारीची आवक केवळ आठ टक्क्यांवर घसरली आहे. उत्पादनाची स्थिरता, चाऱ्याची उपलब्धता आणि बाजारातील हमीभावामुळे शेतकऱ्यांचा कल मक्याकडे झपाट्याने वळत असल्याचे स्पष्ट दिसते. (Crop Pattern Change)
मक्याच्या लागवडीत विक्रमी वाढ
जिल्ह्यातील मक्याचे सरासरी क्षेत्र : २३,९९५.९ हेक्टर
यंदाची प्रत्यक्ष लागवड : ४९,५१२ हेक्टर
सरासरीत दुप्पट वाढ
मका पिकाचे उत्पादन तुलनेने स्थिर राहते, तसेच काढणीनंतर जनावरांसाठी चारा सहज उपलब्ध होतो. बाजारात मक्याला सतत मागणी असल्याने आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वेगाने वळत आहेत.
ज्वारीची घटती लागवड
जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र : ५,६४८.७१ हेक्टर
यंदाची प्रत्यक्ष लागवड : ४७१ हेक्टर
पावसाचा अनियमित पॅटर्न, रोग-कीड प्रादुर्भाव आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी ज्वारीकडे पाठ फिरवत आहेत. पारंपरिक ज्वारीचे क्षेत्र घटल्याने कृषी पॅटर्नमध्ये दीर्घकालीन बदल दिसत आहे.
कृषी पॅटर्नमध्ये बदलाचे संकेत
ज्वारीच्या तुलनेत मका लागवड स्थिर आणि फायदेशीर असल्याचे चित्र उभे राहिले आहे. चारा उपलब्धतेसह हमीभाव आणि उत्पादनातील सातत्य यामुळे मका पिकाला प्राधान्य मिळत आहे. हा बदल फक्त हंगामी नसून भविष्यातील कृषी धोरणांसाठी दिशा ठरवणारा ठरू शकतो.
ज्वारीचे उत्पादन वर्षानुवर्षे घटत असून चांगला भाव मिळत नाही. मका मात्र स्थिर आणि लाभदायी आहे. त्यामुळे आम्ही मक्याकडे वळलो आहोत. भविष्यात ज्वारी घेण्याची शक्यता फारच कमी दिसते.- उमेश बावस्कार, शेतकरी
मका आणि ज्वारीतील लागवडीचा हा फरक शेतकऱ्यांच्या विचारसरणीत झालेल्या बदलाचे प्रतीक आहे. मका पिकाच्या स्थैर्यामुळे आणि चाऱ्यासाठीच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत मक्याकडे कल वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.