Join us

Crop Management : पाऊस लांबल्यास 'या' पिकांची लागवड करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 20:05 IST

Crop Management : पाऊस लांबल्यास उशिरा पेरणीसाठी नेमके कोणत पीक निवडावे? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात... 

Agriculture News : राज्यात काही ठिकाणी वेळेवर चांगल्या प्रमाणात पावसाची (Rain) सुरवात झाली. मात्र काही भागात खंड, काही भागात अद्यापही समाधानकारक पावसाला सुरवात नाही. सुरवातीला पडलेल्या पावसावर पेरलेल्या (Crop Sowing)  पिकाची वाढ खुंटते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहते. अशावेळी उशिरा पेरणीसाठी नेमके कोणत पीक निवडावे? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात... 

जुलैचा पहिला पंधरवडा : या काळात बाजरी, राळा, राजगिरा, भुईमूग, एरंडी, तूर, हुलमा, सूर्यफूल तर आंतरपिके म्हणून बाजरी तुर 2 : 1 अशा पद्धतीने पेरावेत. जुलैचा दुसरा पंधरवडा : बाजरी, राळा, एरंडी, तूर, हुलमा, सूर्यफूल. तर आंतर पिकांमध्ये सूर्यफूल + तूर 2 : 1, तुर + गवार 1 : 2, बाजरी + तुर 2 : 1 अशा पद्धतीने पेरावेत. 

तर ऑगस्टचा पहिला पंधरवडा : एरंडी, तुर, हुलमा, सूर्यफूल. तर आंतर पिकांमध्ये सूर्यफूल + तुर 2 : 1, एरंडी + दोडका  (मिश्र पीक) दुसरा पंधरवडा : एरंडी किंवा सूर्यफूल.

दरम्यान आंतरपिके घेतल्याने कुठल्याही प्रकारच्या विपरीत परिस्थितीत दोन्हीपैकी किमान एका पिकाचे चांगले उत्पादन मिळते. अन्यथा नेहमीच्या परिस्थितीत मुख्य पिकाबरोबर आंतर पिकाचे बोनस उत्पादन मिळते.

टॅग्स :पेरणीपीक व्यवस्थापनपीकलागवड, मशागतपाऊस