Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance : खरीप हंगामात मोठे नुकसान; पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?

Crop Insurance : खरीप हंगामात मोठे नुकसान; पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?

latest news Crop Insurance: Huge losses during Kharif season; Will farmers get relief from crop insurance? | Crop Insurance : खरीप हंगामात मोठे नुकसान; पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?

Crop Insurance : खरीप हंगामात मोठे नुकसान; पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?

Crop Insurance : अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोग अहवालावर ठरणार असल्याने, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार हे लवकरच समजेल. (Crop Insurance)

Crop Insurance : अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोग अहवालावर ठरणार असल्याने, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार हे लवकरच समजेल. (Crop Insurance)

Crop Insurance : अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोग अहवालावर ठरणार असल्याने, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार हे लवकरच समजेल. (Crop Insurance)

यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, सलग पावसाचा मारा आणि पुराच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Crop Insurance)

या नुकसानीची भरपाई म्हणून किती शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार, याबाबत आता सर्वांचे लक्ष जिल्ह्यात सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगांवर खिळले आहे.(Crop Insurance)

जिल्ह्यातील पीक विमा घेणाऱ्यांची संख्या

या खरीप हंगामात १ लाख १५ हजार १३७ शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद आदी पिकांचा विमा काढला आहे. 

यंदापासून पीक विम्याचा लाभ पीक कापणी प्रयोगातील उत्पन्नावर आधारित ठरवला जाणार आहे. म्हणजेच, ज्या महसूल मंडळात गेल्या सात वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाले आहे, त्या क्षेत्रातील शेतकरी विमा लाभासाठी पात्र ठरणार आहेत.

पीक कापणी प्रयोगांची सद्यस्थिती

जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांत महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागामार्फत कापणी प्रयोग सुरू आहेत. त्यात मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांचे प्रयोग पूर्ण झाले असून सध्या सोयाबीन पिकाची कापणी सुरू आहे. या प्रयोगांतून मिळालेल्या उत्पादनाच्या अहवालावरच विमा पात्रतेचा निर्णय होईल.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सलग पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली. विशेषतः सोयाबीन, कपाशी, तूर या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.

अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवला जाणार

पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक महसूल मंडळातील उत्पन्नाचा सविस्तर अहवाल तयार करून राज्य कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. 

या अहवालाच्या आधारेच जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना व किती प्रमाणात पीक विम्याचा लाभ मिळणार हे निश्चित होईल.

सध्या शेतकऱ्यांच्या नजरा या प्रयोगांच्या निकालावर खिळल्या असून, गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे नुकसान झालेल्या खरीप हंगामात तरी योग्य भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Crop Insurance : सोयाबीन पीक कापणी प्रयोग सुरू; लाखों शेतकऱ्यांची नजर निकालावर!

अधिक वाचा : Crop Insurance : 'या' जिल्ह्यात १ लाखाहून अधिक शेतकरी विमा कवचाखाली

Web Title : अकोला के किसानों को फसल नुकसान; कटाई के बाद बीमा लाभ का आकलन।

Web Summary : अकोला के जिन किसानों ने खरीफ फसलों का बीमा कराया है, वे अनिश्चितता का सामना कर रहे हैं। भारी बारिश से हुए नुकसान के कारण बीमा लाभ फसल उपज प्रयोगों पर निर्भर करता है। रिपोर्ट पात्र किसानों का खुलासा करेगी।

Web Title : Akola Farmers Face Crop Loss; Insurance Benefits Assessed After Harvest.

Web Summary : Akola farmers who insured kharif crops face uncertainty. Insurance benefits depend on harvest yield experiments due to heavy rain damage. Reports will reveal eligible farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.