गजानन मोहोड
खरीप हंगाम अगदी जवळ आलेला असताना, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संकरीत कपाशीच्या एक विशिष्ट वाणासाठी मोठी मागणी निर्माण झाली आहे. (Cotton Variety)
मागील वर्षी याच वाणासाठी कृषी सहायक व पोलिस बंदोबस्तात विक्री करावी लागली होती, तरीही यंदा देखील या वाणाचा पुरवठा कमी झाल्याचे चित्र आहे. (Cotton Variety)
या वर्षी १.२० लाख बियाण्याच्या पाकिटांची मागणी संबंधित कंपनीकडे नोंदविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात फक्त ७४ हजार १२० पाकिटांचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. त्यामुळे 'त्या' वाणाच्या तुटवड्याचे संकट गडद होत आहे.(Cotton Variety)
कुठे किती पुरवठा झाला?
अमरावती : ३९,७६० पाकिटे
धामणगाव : ७,८४० पाकिटे
दर्यापूर : ११,३०० पाकिटे
भातकुली : १,९८० पाकिटे
अंजनगाव : २,६४० पाकिटे
अचलपूर : १,९८० पाकिटे
मोर्शी : २,७८० पाकिटे
वरूड : २,३६० पाकिटे
तिवसा : ३,४८० पाकिटे
मागणी आणि उत्पादनातील विसंगती
गेल्या वर्षीही याच परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना रेशनिंगअंतर्गत बियाणे घ्यावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा तरी कृषी विभागाने आवश्यक ती तयारी केली असे वाटत नाही. सर्व वाणांची उत्पादकता सारखीच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त एका वाणावर अवलंबून राहू नये.
बेल्टनुसार वेगवेगळ्या वाणांची मागणी
वरूड, मोर्शी : एका विशिष्ट वाणाची मागणी
चांदूर रेल्वे, धामणगाव : दुसऱ्या वाणाचे प्राधान्य
खारपाण पट्ट्यात : विशिष्ट वाणाला अधिक पसंती
संकरीत कपाशीच्या सर्वच वाणांची उत्पादकता सारखीच आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ठ वाणाचा आग्रह धरू नये, बियाण्यांसाठी कंपनी एकत्रितपणे मागणी नोंदविते, त्या वाणांच्या बियाण्यासाठी कंपनीला पत्र दिले आहे. - राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी