Lokmat Agro >शेतशिवार > Cotton Farming : कापूस पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना 'हे' फायदेशीर तंत्र सांगितलं जातंय!

Cotton Farming : कापूस पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना 'हे' फायदेशीर तंत्र सांगितलं जातंय!

latest news cotton farming new techniques to increase cotton crop production, read in detail | Cotton Farming : कापूस पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना 'हे' फायदेशीर तंत्र सांगितलं जातंय!

Cotton Farming : कापूस पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना 'हे' फायदेशीर तंत्र सांगितलं जातंय!

Cotton Farming : कापसाचे क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर असले, तरी उत्पादकता मात्र कमी आहे.

Cotton Farming : कापसाचे क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर असले, तरी उत्पादकता मात्र कमी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्रात (Krushi Vidnayn Kendra) भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या मार्फत विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. यांतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यात शेतकऱ्यांनी सहभाग घेत कापूस पीक उत्पादन वाढीचे तंत्र जाणून घेतले.

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) दरवर्षीप्रमाणेच कापूस लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. बागायती आणि कोरडवाहू कापूस मोठ्या प्रमाणावर परिसरात घेतला जातो. कापसाचे क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर असले, तरी उत्पादकता मात्र कमी आहे. कापसाच्या कमी उत्पादकतेची अनेक करणे आहेत. प्रामुख्याने अयोग्य जमीन निवड, रोग किडींचा प्रादुर्भाव, खत व्यवस्थापन या बाबी समोर आल्या आहेत. 

पिकांच्या उत्पादन वाढीचे तंत्र आणि उत्पादन विक्रीच्या मंत्राने वाटचाल केली, तरच शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होण्यास मदत होईल. कापसाच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेत वाढ होण्यासाठी जमिनीच्या आरोग्यानुसार घन आणि अतिसघन लागवडीचे तंत्रज्ञान शिफारस केले आहे. या तंत्रज्ञानाबाबत सध्या केंद्राकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे.

अशी लागवड पद्धती...
प्रात्यक्षिकांद्वारे मध्यम प्रतीच्या जमिनीसाठी घन लागवड आणि हलक्या जमिनीसाठी अति घन लागवड शिफारस करण्यात आली आहे. यात घन लागवड आणि झाडाच्या नियमनासाठी दादा लाड तंत्रद्यानाची प्रात्याक्षिके घेतली जात आहेत. एकरी वाढलेली झाडांची संख्या आणि आणि झाडांची वाढ मर्यादित ठेवल्याने बोंडाचा आकार वाढल्याने उत्पाद्दनात वाढ दिसून येते. 

कापसाची घन लागवड पद्धतीत मध्यम खोल काळी जमिनीत २० ते ३० सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी. दोन ओळीत तीन फूट आणि दोन झाडांमध्ये एक फूट अंतर ठेवले जावू शकते. यामुळे झाडांच्या संख्येत एकरी वाढ होते. या पद्धतीत वाढ रोधकाची पहिली फवारणी ४५ दिवस, दुसरी ६५ दिवस आणि आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी ८५ ते ९० दिवसांनी करण्याचे सूचित करण्यात आले.

Web Title: latest news cotton farming new techniques to increase cotton crop production, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.