Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Cotton Farmer Crisis : कपाशीचे बोंडे सडली, भाव पडला; यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांवर आघात

Cotton Farmer Crisis : कपाशीचे बोंडे सडली, भाव पडला; यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांवर आघात

latest news Cotton Farmer Crisis: Cotton bolls rot, prices fall; Farmers hit hard this season | Cotton Farmer Crisis : कपाशीचे बोंडे सडली, भाव पडला; यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांवर आघात

Cotton Farmer Crisis : कपाशीचे बोंडे सडली, भाव पडला; यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांवर आघात

Cotton Farmer Crisis : परतीच्या पावसाचा प्रचंड फटका, कापसावरील रोगांचे वाढते धोकादायक आक्रमण आणि कपाशी वेळेआधी लाल पडल्याने यंदाचा कपाशी हंगाम नोव्हेंबरमध्येच संपत चालला आहे. (Cotton Farmer Crisis)

Cotton Farmer Crisis : परतीच्या पावसाचा प्रचंड फटका, कापसावरील रोगांचे वाढते धोकादायक आक्रमण आणि कपाशी वेळेआधी लाल पडल्याने यंदाचा कपाशी हंगाम नोव्हेंबरमध्येच संपत चालला आहे. (Cotton Farmer Crisis)

Cotton Farmer Crisis : परतीच्या पावसाचा तडाखा, कापसावरील रोगांचे वाढते आक्रमण आणि कपाशी वेळेआधीच लाल पडण्याच्या समस्येमुळे यंदाचा कपाशी हंगाम जवळजवळ महिनाभर लवकरच संपत चालला आहे. (Cotton Farmer Crisis)

सामान्यतः डिसेंबर–जानेवारीपर्यंत चालणारी कपाशीची वेचणी यंदा नोव्हेंबरमध्येच थांबण्याच्या स्थितीत आली आहे. त्यामुळे पिकांसाठी केलेला प्रचंड खर्चही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.(Cotton Farmer Crisis)

परतीच्या पावसाने बोंडे सडली; उत्पादनात मोठी घट

खरीप हंगामात परतीचा पाऊस अत्यंत तीव्र झाला. त्याचा फटका कापसाला सर्वाधिक बसला. अनेक भागांत कापसाची पक्व बोंडे सडली, तर झाडांवरील कापूस लाल पडून खराब झाला. वेचणीला सुरुवात झाल्यानंतर अनेक बोंडे उघडी पडल्याने गुणवत्तेवर परिणाम झाला.(Cotton Farmer Crisis)

मजुरांसाठी ही वेचणी अतिशय कष्टदायक ठरली असून दिवसभर मजुरी करून त्यांना केवळ १० ते १५ किलो कापूस गोळा करता येत आहे. शेतकऱ्यांना एक मजूर ठेवण्यासाठीच ३०० रुपये अर्धा दिवस मजुरी द्यावी लागत आहे. परंतु बाजारभाव मिळत नसल्याने हीच मजुरी परवडणे कठीण झाले आहे.(Cotton Farmer Crisis)

आर्थिक गणित कोलमडले

अगदी काही वर्षांपूर्वी प्रतिक्विंटल १२ हजाराच्या आसपास दर मिळणारा चांगल्या दर्जाचा कापूस यंदा केवळ ५ हजार ते ६ हजार प्रतिक्विंटल या दरात विकला जात आहे.

खासगी व्यापारी ओलावा आणि खराब गुणवत्तेचे कारण देत तुटपुंज्या दरात कापसाची खरेदी करीत आहेत. बाजारपेठेत मिळणाऱ्या या चिल्लर दरामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट कोलमडत आहे.

शेतकरी विचारत आहेत हे प्रश्न

'हा कापूस विकून घरखर्च, कर्ज, पेरणी याचे काय?'

खर्च वाढतोय; उत्पन्न मात्र घटतंय

शेतीवरील खर्च वर्षागणिक वाढत आहे.

बियाण्यांचे दर वाढले

रासायनिक खते महागली

कीटकनाशकांचे दर वाढून शेतकऱ्यांची खिसपट्टी रिकामी

मजुरीतही प्रचंड वाढ

यामुळे शेतकऱ्यांना कापसावर केलेली गुंतवणूक निम्मीही परत येत नाही. उत्पादनात घट आणि भाव न मिळणे या दुहेरी संकटाने शेतकरी हतबल झाले आहेत.

रोगांचे आक्रमण

परतीचा पाऊस ओसरल्यावर लाल्या, मर व इतर बुरशीजन्य रोगांनी कापसाला ग्रासले. त्यामुळे झाडावरील बोंडांची संख्या कमी झाली. अनेक भागांत ३० ते ४० टक्के उत्पादन घटल्याची नोंद आहे. त्यातच बाजारभाव कोसळल्याने शेतीतून मिळणारी एकमेव कमाईही धोक्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर डबल संकट

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, कीडरोग, बाजारभावातील चढ-उतार या सर्वांचा संयुक्त फटका कपाशी उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीतून बाहेर पडण्याचा विचार करीत आहेत.

कपाशीचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपत असून पुढील खरीपाची पेरणी, खतखर्च, रोजच्या घरखर्चाची तजवीज या सर्वांवरच अनिश्चिततेचे सावट आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : शेतकऱ्यांची अडवणूक रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; कापूस खरेदीवर कडक 'वॉच' वाचा सविस्तर

Web Title : कपास किसानों पर संकट: फसल नुकसान, कम कीमतों की मार।

Web Summary : कपास किसान बेमौसम बारिश, फसल रोगों और समय से पहले लाल होने के कारण संकट का सामना कर रहे हैं। उपज कम हो गई है, और कीमतें गिर गई हैं, जिससे किसान लागत को कवर करने के लिए संघर्ष कर रहे हैं और अनिश्चित भविष्य का सामना कर रहे हैं। कई लोग खेती छोड़ने पर विचार कर रहे हैं।

Web Title : Cotton farmers face crisis: Crop loss, low prices hit hard.

Web Summary : Cotton farmers are facing a crisis due to unseasonal rains, crop diseases, and premature reddening. Yields are down, and prices have plummeted, leaving farmers struggling to cover costs and facing an uncertain future. Many are considering leaving farming altogether.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.